Thursday, February 26, 2026
Homeकोल्हापूरदुकान बंद करत असताना सराफाचे 20 तोळे सोने, दीड लाख रु. लंपास

दुकान बंद करत असताना सराफाचे 20 तोळे सोने, दीड लाख रु. लंपास

गोकुळ शिरगाव (ता. करवीर) येथील कमानीजवळ असलेले सराफी दुकान बंद करत असताना अज्ञात चोरट्यांनी 20 तोळे सोने व 1 लाख 60 हजार रुपये रोख रक्कम, असा सुमारे 25 लाख 36 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केला.

 

घटना मंगळवारी रात्री आठच्या सुमारास घडली.

 

प्रकाश आनंदराव भोसले (वय 65) यांनी याप्रकरणी गोकुळ शिरगाव पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. भोसले यांचे गोकुळ शिरगाव कमानीजवळ सोन्या-चांदीचे दुकान आहे. नेहमीप्रमाणे मंगळवारी रात्री आठच्या सुमारास ते दुकान बंद करण्यासाठी आवराआवर करत होते. यावेळी बॅगेत सोन्याचे दागिने व रोख रक्कम त्यांनी ठेवली होती. ही बॅग दाराजवळ ठेवून ते किल्ली आणण्यासाठी आत गेले असता अवघ्या काही सेकंदातच दोन चोरट्यांनी त्यांची बॅग घेऊन धूम ठोकली.

 

या बॅगेमध्ये असलेले टॉप्स, कानवेल, बंगाली वाट्या, कानसाखळ्या, राजकोट डोरली, शिंपल्या डोरली, मनी असे साधारणत: 19 तोळे 8 ग्रॅम वजनाचे अंदाजे 23 लाख 75 हजार रुपये किमतीचे दागिने व रोख रक्कम एक लाख 60 हजार, असा सुमारे 25 लाख 36 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केला. तपास पोलिस निरीक्षक अनिल तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -