Saturday, February 28, 2026
Homeकोल्हापूरKolhapur धावत्या स्पोर्टस् बाईकला आग; आगीवर नियंत्रण, व्यावसायिक कामत यांचे प्रसंगावधान

Kolhapur धावत्या स्पोर्टस् बाईकला आग; आगीवर नियंत्रण, व्यावसायिक कामत यांचे प्रसंगावधान

दसरा चौकातून फोर्ड कॉर्नरला निघालेल्या स्पोर्टस् बाईकने अचानक पेट घेतला. दसरा चौकातील टायटन शोरूम समोरच दुचाकी सोडून चालक मदतीसाठी आरडाओरड करू लागला. इंजिनमधून धूर येऊ लागल्याने जवळ जाण्याची प्रत्येकाला भीती वाटत होती.

 

इतक्यात, टायटन तनिष्का शोरूमचे मालक प्रसाद कामत यांनी धाडस दाखवत त्यांच्या शोरूममधील डीसीपी (ड्राय केमिकल पावडर) सिलिंडरमधून फवारणी करीत अवघ्या काही मिनिटांत आग नियंत्रणात आणली. त्यांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

 

दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास एक दुचाकीस्वार दसरा चौकाकडून आला. टायटन शोरूमसमोर त्याच्या दुचाकीतून धूर येताना त्याला समजले. इंजिनही गरम झाल्याने त्याने हातातून दुचाकी सोडली.

 

आगीवर नियंत्रण कसे मिळवावे हे समजत नसल्याने तो गोंधळून गेला. मदतीसाठी ओरडू लागला. मात्र, मदतीला कोणी आले नाही. टायटन तनिष्का शोरूमच्या समोर घडलेल्या प्रकाराची माहिती कर्मचाऱ्यांनी शोरूम मालक प्रसाद कामत यांना दिली.

 

त्यांनी पुढाकार घेत शोरूममधील डीसीपी फायर इस्टिंगशर आणून पावडर केमिकलही फवारणी केली. अवघ्या काही मिनिटांतच आग आटोक्यात आली. शोरूम मालक कामत यांच्या सर्वच शोरूममध्ये आग शमविणारी अद्ययावत यंत्रणा आहे.

 

तसेच वेळोवेळी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाते. त्यांनीही याचे प्रशिक्षण घेतले आहे. आज घडलेल्या या प्रसंगावेळी ते स्वतः मदतीला पुढे धावून आल्याने दुचाकी चालकाने त्यांचे आभार मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -