Monday, March 9, 2026
Homeमहाराष्ट्रनातवाचा आजीवर अत्याचार, शरीराचे चावे घेऊन संपवलं, हादरवून टाकणारी घटना

नातवाचा आजीवर अत्याचार, शरीराचे चावे घेऊन संपवलं, हादरवून टाकणारी घटना

नातेसंबंधांना काळिमा फासणारी अत्यंत धक्कादायक घटना मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यात उघडकीस आली आहे. भोजपुर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घाटाखेड़ी गावात एका तरुणाने आपल्या वृद्ध आजीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या (Crime News) केल्याची घटना समोर आली आहे.

 

या प्रकरणात पोलिसांनी अवघ्या २४ तासांत आरोपीला अटक केली असून त्याने चौकशीत गुन्ह्याची कबुली दिली आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.(Crime News)मिळालेल्या माहितीनुसार, घाटाखेड़ी गावातील एका शेताजवळील झोपडीत ही घटना घडली. बुधवारी सकाळी डायल-११२ वर एका वृद्ध महिलेला अज्ञात व्यक्तीने गंभीर जखमी केल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमी महिलेला रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.(Crime News)

 

घटनास्थळी पोलिसांनी फॉरेन्सिक आणि फिंगरप्रिंट पथकाच्या मदतीने तपास करून महत्त्वाचे पुरावे गोळा केले. प्राथमिक चौकशीत समोर आलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री गावातील शेताजवळ काही जणांची जेवणाची पार्टी सुरू होती. त्या वेळी महिलेचा मुलगा तिला शेतातील झोपडीत एकटीलाच सोडून पार्टीला गेला होता.(Crime News)दरम्यान, पार्टीत उपस्थित असलेला रामनिवास भील हा काही वेळाने कोणालाही न सांगता तेथून निघून गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी महिलेला शोधताना ती जवळच्या गव्हाच्या शेतात गंभीर जखमी अवस्थेत पडलेली आढळली. तिच्या तोंडातून आणि नाकातून रक्त येत होते तसेच जबड्यावर गंभीर जखमा होत्या.

 

घटनास्थळी आरोपीचे काही कपडेही आढळून आले. गावकऱ्यांकडून चौकशी केल्यानंतर आरोपी त्या रात्री रक्ताने माखलेल्या अवस्थेत घरी परतल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर त्याने कपडे बदलून गावातून पळ काढला होता. पोलिसांनी परिसरातून मोबाईल फोन, रक्ताने माखलेले कपडे आणि इतर पुरावे जप्त केले.

 

तपासादरम्यान पोलिसांनी आरोपी रामनिवास रायसिंह भील याला अटक केली. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली देत वृद्ध महिलेकडे तो बराच काळ वाईट नजरेने पाहत असल्याचे सांगितले. आरोपी हा मृत महिलेचा सख्खा नातू नसून दूरच्या नात्यातील नातू असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.या प्रकरणाचा तपास पुढे सुरू असून आरोपीविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.

 

चौकशीत समोर आली धक्कादायक बाब

 

पोलिसांच्या चौकशीत आरोपीने आपला गुन्हा कबूल केला. त्याने सांगितले की, तो बराच काळ त्या वृद्ध महिलेवर वाईट नजरेने लक्ष ठेवून होता. ३ मार्च रोजी त्याने नियोजनपूर्वक कोंबडी खरेदी केली आणि कोंबडी पार्टीचे कारण सांगून त्या वृद्धेच्या मुलाला पार्टीसाठी बोलावून घेतले. पार्टी सुरू असताना आरोपी हळूच तेथून निघून शेतातील झोपडीकडे गेला, जिथे ती वृद्ध महिला एकटी होती. त्याने तिला आवाज देऊन बाहेर बोलावले आणि जबरदस्तीने जवळच्या गव्हाच्या शेतात नेले. तेथे त्याने तिच्यावर बलात्कार केला.

 

दरम्यान, वृद्ध महिलेनं विरोध करत आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आरोपीने अत्यंत क्रूरपणे तिच्या नाकावर आणि तोंडावर दातांनी चावा घेत गंभीर जखमी केले. या जखमांमुळे ती गंभीर अवस्थेत गेली आणि नंतर तिचा मृत्यू झाला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -