Thursday, April 16, 2026
Homeकोल्हापूरकोल्हापूरात हादरवणारा गुन्हा! अपहरणानंतर व्यावसायिकाला शॉक देवून संपवलं

कोल्हापूरात हादरवणारा गुन्हा! अपहरणानंतर व्यावसायिकाला शॉक देवून संपवलं

कोल्हापूर जिल्ह्यातील दानोळी गावात घडलेल्या खंडणी आणि (Businessman)अपहरणाच्या थरारक प्रकरणाने संपूर्ण परिसर हादरला आहे. इथं 25 लाख रुपयांच्या खंडणीसाठी 40 वर्षीय व्यावसायिक भरतेश राजगोंडा टोपगोंडा यांचे अपहरण करून निर्घृण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. कोल्हापूरात घडलेल्या या प्रकरणी जयसिंगपूर पोलिसांनी तातडीनं कारवाई करत टिल्लू पवार आणि राजदीप ताडे या दोघांना अटक केली. तपासादरम्यान आरोपींनी अपहरणानंतर भरतेश यांना बॅटरीच्या साहाय्याने शॉक देऊन ठार केल्याचं निष्पन्न झालं.मिळालेल्या माहितीनुसार, दानोळीतील शेरी मळा परिसरात ही घटना घडली. रात्री उशिरा अज्ञातांनी भरतेश टोपगोंडा यांचे अपहरण केलं. त्यानंतर त्यांच्या स्वतःच्या मोबाईलवरूनच त्यांच्या नातेवाईकांना कॉल करून 25 लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली. आरोपींनी ठराविक ठिकाणी पैसे घेऊन येण्यास सांगितलं, मात्र सतत लोकेशन बदलत नातेवाईकांना गोंधळात टाकलं. काही वेळातच मोबाईल बंद करण्यात आला आणि संपर्क तुटला.

 

दरम्यान, काही तासांतच भरतेश यांचा खून झाल्याचं उघड (Businessman)झाल्यानं गावात एकच खळबळ उडाली. संतप्त ग्रामस्थांनी जयसिंगपूर पोलीस ठाण्याकडे धाव घेत निषेध व्यक्त केला. सुरुवातीला केवळ बेपत्ता नोंद करण्यात आल्यामुळे नागरिकांनी पोलिसांच्या कारवाईवर नाराजी व्यक्त केली होती. घटनेची गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी वेगानं तपास सुरू केला आणि संशयितांना ताब्यात घेत चौकशी केली असता संपूर्ण प्रकार उघडकीस आला. या घटनेमुळे दानोळी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झालं असून, आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. पुढील तपास जयसिंगपूर पोलीस करत आहेत.पोलिसांच्या माहितीनुसार भरतेश्वर सोमवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास घरी निघाले असतानाच आरोपींनी त्यांना अडवलं आणि त्यांच्या चुलत भावाला फोन केला. भरतेश्वर फ्लॉवरचं 25 लाखांचं देणं लागतो सांगत पैशांची मागणी केली. रात्री 11 च्या सुमारास याबाबतची माहिती पोलिसांना मिळाली, ज्यानंतर ग्रामस्थांसह शोधमोहिम राबवरी असता शेरीमळा इथं रस्त्या वर ऊसामध्ये भरतेश्वर यांची चप्पल आणि गाडी दिसली अन् तिथंच ऊसाच्या शेतात त्यांचा मृतदेह सापडला.

 

कोल्हापूर जिल्ह्यातील दानोळी गावात घडलेल्या खंडणी आणि अपहरणाच्या (Businessman)थरारक प्रकरणाने संपूर्ण परिसर हादरला आहे. इथं 25 लाख रुपयांच्या खंडणीसाठी 40 वर्षीय व्यावसायिक भरतेश राजगोंडा टोपगोंडा यांचे अपहरण करून निर्घृण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. कोल्हापूरात घडलेल्या या प्रकरणी जयसिंगपूर पोलिसांनी तातडीनं कारवाई करत टिल्लू पवार आणि राजदीप ताडे या दोघांना अटक केली. तपासादरम्यान आरोपींनी अपहरणानंतर भरतेश यांना बॅटरीच्या साहाय्याने शॉक देऊन ठार केल्याचं निष्पन्न झालं.मिळालेल्या माहितीनुसार, दानोळीतील शेरी मळा परिसरात ही घटना घडली. रात्री उशिरा अज्ञातांनी भरतेश टोपगोंडा यांचे अपहरण केलं. त्यानंतर त्यांच्या स्वतःच्या मोबाईलवरूनच त्यांच्या नातेवाईकांना कॉल करून 25 लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली. आरोपींनी ठराविक ठिकाणी पैसे घेऊन येण्यास सांगितलं, मात्र सतत लोकेशन बदलत नातेवाईकांना गोंधळात टाकलं. काही वेळातच मोबाईल बंद करण्यात आला आणि संपर्क तुटला.

 

दरम्यान, काही तासांतच भरतेश यांचा खून झाल्याचं उघड झाल्यानं गावात एकच खळबळ उडाली. संतप्त ग्रामस्थांनी जयसिंगपूर पोलीस ठाण्याकडे धाव घेत निषेध व्यक्त केला. सुरुवातीला केवळ बेपत्ता नोंद करण्यात आल्यामुळे नागरिकांनी पोलिसांच्या कारवाईवर नाराजी व्यक्त केली होती. घटनेची गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी वेगानं तपास सुरू केला आणि संशयितांना ताब्यात घेत चौकशी केली असता संपूर्ण प्रकार उघडकीस आला. या घटनेमुळे दानोळी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झालं असून, आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. पुढील तपास जयसिंगपूर पोलीस करत आहेत.पोलिसांच्या माहितीनुसार भरतेश्वर सोमवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास घरी निघाले असतानाच आरोपींनी त्यांना अडवलं आणि त्यांच्या चुलत भावाला फोन केला. भरतेश्वर फ्लॉवरचं 25 लाखांचं देणं लागतो सांगत पैशांची मागणी केली. रात्री 11 च्या सुमारास याबाबतची माहिती पोलिसांना मिळाली, ज्यानंतर ग्रामस्थांसह शोधमोहिम राबवरी असता शेरीमळा इथं रस्त्या वर ऊसामध्ये भरतेश्वर यांची चप्पल आणि गाडी दिसली अन् तिथंच ऊसाच्या शेतात त्यांचा मृतदेह सापडला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -