Tuesday, May 19, 2026
Homeमहाराष्ट्रमोठा दणका! पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत पुन्हा वाढ, ज्याची भीती तेच घडले,...

मोठा दणका! पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत पुन्हा वाढ, ज्याची भीती तेच घडले, तब्बल..

इराण आणि अमेरिका युद्धाचा भारतावर परिणाम होत आहे. महागाईमध्ये वाढ झाली. हेच नाही तर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होतंय. पाच दिवसांपूर्वीच पेट्रोल 3 रूपयांनी तर डिझेलही 3 रूपयांनी वाढवण्यात आले. होर्मुज खाडी बंद असल्याने कच्च्या तेलाचा तुटवडा निर्माण झाला. काही देशांमध्ये पेट्रोल आणि डिझेल पूर्णपणे संपल्याने थेट लॉकडाऊनची स्थिती आहे. जागतिक बाजारात सतत कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये वाढ होतंय. ऊर्जेचे मोठे संकट आहे. इराण आणि अमेरिका युद्धाचा फटका जगाला बसत आहे. केंद्र सरकार मागील आठ दिवसांपासून मोठे निर्णय घेताना दिसतंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला पुढील 1 वर्षाकरिता सोने न खरेदी करण्याचे आवाहन केले. यासोबतच विदेश प्रवास आणि पेट्रोल आणि डिझेलच्या कमी वापराबद्दल आवाहन केले. यानंतर त्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये मोठी वाढ केली.

 

पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये वाढ करून 5 दिवस होत नाहीत तोवरच आता पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये मोठी वाढ करण्यात आली. पाच दिवसातच ही वाढ झाल्याचे बघायला मिळत आहे. देशभरात पेट्रोलचे दर 86 पैशांनी तर डिझेलचे दर 83 पैशांनी वाढले आहेत. चार वर्षात सरकारने पेट्रोल आणि डिझेलचे दर नियंत्रणात ठेवत वाढ केली नव्हती.

 

इराण आणि अमेरिका युद्धाचा जोरदार फटका बसत आहे. पाच दिवसांमध्ये पुन्हा दरामध्ये वाढ करण्यात आली. यासोबतच सोने आणि चांदीबद्दलही सरकारने मोठा निर्णय घेतला. महागाईचा मोठा झटका जनतेला बसत आहे. सतत महागाई वाढत आहे. सध्या पेट्रोल आणि डिझेलच्या वाढलेल्या दरांमुळे पैशांचे गणित फिसकटताना दिसत आहे.

 

इराण आणि अमेरिका युद्ध पुढील काही दिवस असेच सुरू राहिले तर याचा मोठा फटका बसू शकतो. पुढील काही दिवसात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात यापेक्षाही जास्त वाढ होण्याचे संकेत आहेत. होर्मुज खाडीत मोठ्या प्रमाणात तणाव असल्याने जहाज अडकले आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या एकीकडे तुटवडा तर दुसरीकडे त्याच्या दरात सतत वाढ होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -