Wednesday, May 27, 2026
Homeअध्यात्मसुख-समृद्धीचा 'जून' महिना! वटपौर्णिमा, अधिक मासातील एकादशीसह असणार 'हे' सण; जाणून घ्या...

सुख-समृद्धीचा ‘जून’ महिना! वटपौर्णिमा, अधिक मासातील एकादशीसह असणार ‘हे’ सण; जाणून घ्या सण-उत्सवांच्या तारखा

२०२६ वर्षाचा सहावा महिना जून सुरू होणार आहे. ग्रहस्थितीपासून ते अगदी काही उपवास आणि सणांपर्यंत हा महिना खूप विशेष असणार आहे. या महिन्यात अधिक मास आणि निज जेष्ठ असणार आहे.

 

त्याचबरोबर या महिन्याची सुरुवात अधिक मासातील जेष्ठ महिन्याच्या प्रतिपदा तिथीपासून होत आहे आणि विशेष म्हणजे महिन्याचा शेवटही निज जेष्ठ महिन्याच्या प्रतिपदा तिथीनेच होणार आहे. म्हणजेच या वेळी अधिक मास आणि नियमित जेष्ठ महिना एकत्र आल्यामुळे महिन्याची सुरुवात आणि शेवट दोन्ही प्रतिपदा तिथीने होत आहेत. तसेच पौर्णिमा, विनायक चतुर्थी, वटपौर्णिमा असे सण या महिन्यात येतील. तर या महिन्यात येणाऱ्या या सणांच्या तारखा, ग्रहस्थितीबद्दल सविस्तर जाणून घेऊयात…

 

जून महिन्यातील प्रमुख सण-उत्सव

 

८ जून – कालाष्टमी

११ जून – कमला एकादशी

१२ जून – प्रदोष व्रत

१३ जून – मासिक शिवरात्री

१४ जून – दर्श अमावस्या

१५ जून – अधिक जेष्ठ समाप्त, निज जेष्ठ मास प्रारंभ

१६ जून – चंद्रदर्शन

१८ जून – विनायक चतुर्थी

१९ जून – दर्शवेळा अमावस्या

२५ जून – निर्जला एकादशी

२९ जून – वटपौर्णिमा

३० जून – पौर्णिमा समाप्ती

अधिक मासातील एकादशी आणि निर्जला एकादशी कधी असते?

 

निर्जला एकादशीचे २५ जून रोजी साजरी केली जाणार आहे. ही एकादशी २४ जूनला संध्याकाळी ६ वाजून १२ मिनिटांनी सुरु होईल ते २५ जूनला रात्री ८ वाजून ९ मिनिटांनी संपणार आहे. तुम्ही या एकादशीचा उपवास १६ जूनला सकाळी ५ वाजून २५ मिनिटे ते ८ वाजून १३ मिनिटांपर्यंत असणार आहे.

 

त्याचबरोबर अधिक मासातील एकादशीचे व्रत पाळतात त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि अनेक जन्मांच्या पापांपासून त्यांची मुक्ती होते. या एकादशी दुर्मिळ आहेत कारण त्या दर तीन वर्षांनी एकदाच येतात. त्यामुळे अधिक मासाची पहिली एकादशी म्हणजे पद्मिनी एकादशी, जी अधिक मासातील शुक्ल पक्षात येते. तिला कमला एकादशी असेही म्हणतात. ही एकादशी २७ मे २०२६ रोजी साजरी होईल. पद्मिनी एकादशी २६ मे २०२६ रोजी सकाळी ५ वाजून १० मिनिटांनी सुरू होईल आणि २७ मे २०२६ रोजी सकाळी ६ वाजून २१ मिनिटांनी समाप्त होईल. या एकादशीची उपवास सोडण्याची वेळ २८ मे २०२६ रोजी सकाळी ५ वाजून २५ मिनिटे ते ७ वाजून ५६ मिनिटे या वेळेत असणार आहे.

 

अधिक मासातील दुसरी एकादशी परम एकादशी जी ११ जून २०२६ रोजी असणार आहे. परम एकादशी १० जून २०२६ रोजी रात्री १२ वाजून ५७ मिनिटांनी सुरू होईल आणि ११ जून रोजी रात्री १० वाजून ३६ मिनिटांनी वाजता समाप्त होईल. या एकादशीची उपवास सोडण्याची वेळ १२ जून रोजी सकाळी ५ वाजून २३ मिनिटे ते ८ वाजून १० मिनिटे या वेळेत असणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -