Friday, June 2, 2023
Homeक्रीडाInd vs Eng 2nd test: भारताचा थरारक विजय

Ind vs Eng 2nd test: भारताचा थरारक विजय


लॉर्ड्स कसोटी सामन्यात भारताने यजमान इंग्लंडवर 151 धावांनी दणदणीत मात केली आहे. या विजयाबरोबर भारताने 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.


भारताने इंग्लंडसमोर विजयासाठी 272 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पण भारतीय गोलंदाजांच्या वेगवान माऱ्यासमोर इंग्लंडची संपूर्ण टीम अवघ्या 120 धावांवर ऑलआऊट झाली. घरच्या मैदानावर खेळणाऱ्या इंग्लंडचा एकही फलंदाज मोठी धावसंख्या उभारु शकला नाही.



भारतातर्फे मोहम्मद सिराजने सर्वाधिक 4 विकेट घेत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. तर जसप्रीत बुमराहने 3 विकेट घेतल्या. तर ईशांत शर्माने दोन आणि मोहम्मद शमीने एक विकेट घेतली.

RELATED ARTICLES

देश विदेश

महाराष्ट्र

राजकीय घडामोडी

Most Popular

Join our WhatsApp group