लक्झरी बस आणि पीएमटी बसची समोरासमोर धडक; ड्रायव्हर गंभीर जखमी

हडपसर येथे बीआरटी मार्गावर लक्झरी बस आणि पीएमटी बसची समोरासमोर जोरात धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोन्ही गाड्यांचे ड्रायव्हर गंभीर जखमी असून, काही प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.

हा अपघात पहाटे साडे चार वाजण्याच्या सुमारास झाला आहे. दोन्ही गाड्यांचे मोठे नुकसान झाले असून, क्रेनच्या सहाय्याने गाड्या रस्त्यावरून बाजूला काढल्या असून तेथील ट्रॅफीक सुरळीत केली आहे.

Join our WhatsApp group