Friday, June 2, 2023

दहावीची परीक्षा संपताच विद्यार्थ्यांचा गाेंधळ!

आज दहावीचा भूगोलचा शेवटचा पेपर संपला. परिक्षा संपताच त्यांच्या चेहऱ्यावर खूपच आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. दहावीच्या विद्यार्थ्यांनी रंगपंचमी साजरी केली. कोल्‍हापूर येथील पद्माराजे, एस एम लोहिया, न्यू हायस्कूल मधील विद्यार्थ्यांनी रस्त्यावरच आनंद साजरा करत रंगपंचमी साजरी केली.दरम्‍यान, विद्यार्थ्यांच्या या प्रकारामुळे तब्‍बल अर्धा तासाहून अधिक वेळे परिसरातील वाहतूक विस्कळीत झाली होती. यानंतर स्थानिक नागरिकांनी पोलिसांना फोन करून याबाबत माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस तात्‍काळ घटनास्‍थळी पोहचले आणि मुलांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला.

मात्र विद्यार्थी ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने शेवटी पोलिसांनी त्यांना खाक्या दाखवला. दरवर्षी परीक्षा संपल्यानंतर विद्यार्थ्यांकडून होत असलेल्‍या गोंधळाबाबत शाळा प्रशासन काहीच दखल घेत नाही असे असे स्‍थानिक नागरीकांनी माहिती दिली. तसेच या अशा होणा-या घटनांना प्रशासनाने थांबवावे अशी मागणी केली आहे.

RELATED ARTICLES

देश विदेश

महाराष्ट्र

राजकीय घडामोडी

Most Popular

Join our WhatsApp group