Friday, March 29, 2024
Homeकोल्हापूरआजही पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यात अवकाळी पावसाचा इशारा, उष्णतेत वाढ होण्याची शक्यता

आजही पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यात अवकाळी पावसाचा इशारा, उष्णतेत वाढ होण्याची शक्यता

Maharashtra Weather : आजही राज्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आलाय.राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल होत आहे. कुठे उन्हाचा चटका जाणवत आहे तर कधी अवकाळी पाऊस पडत आहे. याचा शेती पिकांना मोठा फटका बसला आहे. आजही राज्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यासह मराठवाड्यातील लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात पावसाची शक्यता जाणवत आहे. दरम्यान, आजपासून (16 एप्रिल) संपूर्ण महाराष्ट्रात अपेक्षित असलेलं अवकाळी वातावरण निवळण्याची शक्यता असल्याची माहिती ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली. माणिकराव खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार कोकणातील चार आणि विदर्भातील 11 अश्या एकूण 15 जिल्ह्यात 16 आणि 17 तारखेला वातावरण निवळण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील 10, मराठवाड्यातील 8 अशा एकूण 18 जिल्ह्यात अजुनही रविवार 23 एप्रिलपर्यंत अवकाळी वातावरणाची शक्यता टिकून असल्याचे खुळे यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -