सतेज पाटील, धनंजय महाडिक एकत्र न येण्यासाठी यंत्रणा कार्यरत : चंद्रकांत पाटील


पालकमंत्री सतेज पाटील(satej patil) आणि धनंजय महाडिक(dhanjay mahadik) यांच्या एकत्रिकरणामुळे अनेकांची दुकाने बंद होणार असल्याने ते दोघे एकत्र येऊ नयेत यासाठी यंत्रणा कार्यरत आहे, असे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील यांनी केले.



बहिरेवाडी येथील जवान ऋषिकेश जोंधळे यांच्या कुटुंबीयांना घर प्रदान कार्यक्रमप्रसंगी चंद्रकांत पाटील बोलत होते. ते म्हणाले, इंच इंच जमिनीसाठी होणार्या लढाईतून कोट्यवधी रुपयांचा खर्च होतो. मात्र, सामंज्यसातून मार्ग काढल्यास हा पैसा वाचला जाऊ शकतो. त्या पैशांतून सामाजिक कामे होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


याप्रमाणेच कोल्हापुरातील सतेज पाटील आणि धनंजय महाडिक यांच्यातील राजकीय संघर्ष सामंजस्यातून सुटल्यास अनेक निवडणुकांचा पैसा वाचेल. त्या पैशांतून सामाजिक उपक्रम राबविता येतील. मात्र, जसे लढाई बंद झाल्यास हत्यारे विकणार्यांची दुकाने बंद होतील. त्याप्रमाणे सतेज पाटील आणि धनंजय महाडिक यांच्यातील संघर्ष संपल्यास अनेकांची दुकाने बंद होतील. त्यामुळे ही दुकाने सुरू राहवीत यासाठी ते दोघे एकत्र येऊ नयेत यासाठी जिल्ह्यात यंत्रणा कार्यरत आहे, असेही ते म्हणाले.

Leave a Reply

Join our WhatsApp group