पन्हाळ्याच्या जंगलात बिबट्याचे दर्शन…

नागरिकांची गर्दी
पन्हाळा गडाच्या रेडिघाटी जवळील जंगलात आज सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास बिबट्याचे दर्शन झाले.

लता मंगेशकर बंगल्याच्या खालील बाजूस हा बिबट्या एका दगडी शिळेवर पहुडला असल्याचे पन्हाळा गडावर पाहिले.
हा बिबट्या दहा मिनिटे दगडावर होता; मात्र तटबंदीवर बिबट्या पाहणार्‍यांचा दंगा वाढत गेल्याने हा बिबट्या जंगलात निघून गेला.

बिबट्या आल्याची वार्ता गावात समजताच बघ्यानी गर्दी जमली होती. पन्हाळ्यात बर्‍याच दिवस नंतर बिबट्याचे दर्शन झाल्याने हा चर्चेचा विषय झाला आहे;

मात्र सध्या पन्हाळ्यातील जनतेला जंगलातच आज बिबट्याचे दर्शन झाल्याने नागरिकांतून भीती व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Join our WhatsApp group