ताजी बातमी/ ऑनलाइन टीम इचलकरंजी/प्रतिनिधी –
नुकत्याच झालेल्या महापुरामुळे चिपळूण, खेड या भागातील नागरिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. त्या भागातील कोष्टी विणकर बांधवांना आर्थिक सहाय्य करावे या उद्देशाने महाराष्ट्र कोष्टी समाज सेवा मंडळाच्या वतीने अर्थिक सहाय्य देणेत आले.
चिपळूण येथे कोष्टी वाडी येथील कामधेनू मंदिरामध्ये व खेड येथील श्री चौंडेश्वरी मंदिरामध्ये पुरग्रस्तांना मदतीचे चेक मंडळाचे अध्यक्ष प्रकाशराव सातपुते, उपाध्यक्ष प्रविण दिवटे, सचिव सुर्यकांत लोले, सदस्य शितल सातपुते यांचे हस्ते प्रदान करण्यात आले.
यावेळी विशाल दिवटे, सौ. रिया घोडे, अरूण रेडेकर, मनोज दिडे, पारस दिवटे, पंकज दिवटे, संदिप वारे, सचिन रेपाळ, घन:श्याम तिरपणकर, अजित गुरसाळे, शिवानी दिवटे, जयंत घोडे आदी कोकणातील पुरग्रस्त विणकर बांधवाना अर्थिक सहाय्य देणेत आले.
याप्रसंगी सुनिल टकले (चिपळूण), पेठे परशुरामचे सरपंच प्रविण पाकले, अध्यक्ष नितीन रेपाळ, अरविद दिंडे, गोपीनाथ रेपाळ, सौ. वृषाली खामकर तसेच स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. आर्थिक सहाय्य मिळवून देणेकरिता विश्वस्त मंडळाचे प्रकाशशेठ कांबळे, अरविंद तापोळे, अंकुशराव उकार्डे, उत्तम म्हेत्रे, खजिनदार विश्वनाथ पोयेकर, महासचिव रामचंद्र निमणकर यांचेसह अनेकांचे सहकार्य लाभले. या आर्थिक मदतीबद्दल पुरग्रस्तांनी मंडळाचे व उपस्थित पदाधिकारी यांचे आभार मानले.