इचलकरंजीत बाप्पांची आरास करूया गीताच्या सीडी व पोस्टर प्रकाशित

ताजी बातमी/ऑनलाइन टीम. इचलकरंजी/प्रतिनिधी –
ए. के. प्रॉडक्शनच्यावतीने बाप्पाची आरास करुया या गीताच्या सीडी व पोस्टरचे प्रकाशन प्रांताधिकारी डॉ. विकास खरात यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी रोटरी क्लबचे अध्यक्ष प्रकाश रावळ होते.


प्रत्येकवर्षी गणेशोत्सवानिमित्त निर्माते, दिग्दर्शक व गीतकार अरुण काशिद हे ए. के. प्रॉडक्शनच्या माध्यमातून गणपती गीताची निर्मिती करतात. यावर्षी त्यांनी बाप्पाची आरास करुया या गीताची निर्मिती केली आहे. त्याचे चित्रिकरण इचलकरंजी येथील गोविंदराव हायस्कूल येथे पार पडले. रे डान्स अ‍ॅन्ड झुंबा स्टुडीओमधील डान्सर आणि प्रविण होगाडे, अनिरुध्द भागवत, पंडीत ढवळे आदी कलाकारांनी यामध्ये काम केले असून विक्रम खांडेकर यांनी मुख्य भूमिका साकारली आहे. या गीताचे कोरिओग्राफी सांगलीच्या सुमित डान्स अ‍ॅकॅडमीचे सुमित साळुंखे यांनी केली आहे. ढोल वादनासाठी केसरी ढोल-ताशा पथकाची साथ मिळाली.


या गीताच्या सीडीचे व पोस्टरचे प्रकाशन प्रांताधिकारी डॉ. विकास खरात यांच्या हस्ते एका साध्या कार्यक्रमात पार पडला. उत्तम गीताची निर्मिती केल्याचे प्रांताधिकारी डॉ. खरात यांनी सांगितले. यावेळी प्रविण होगाडे, विक्रम खांडेकर, ऋषिकेश ठाकुर-देसाई, अनिल डांगरे, किरण डांगरे आदी उपस्थित होते. स्वागत अरुण काशिद यांनी केले.

Leave a Reply

Join our WhatsApp group