संविधान दिवसाच्या पंतप्रधानांकडून देशवासियांना शुभेच्छा

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संविधान दिवसाच्या देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संविधान तयार करण्यासाठी ज्या लोकांनी कठोर परिश्रम घेतले त्यांच्याविषयी आदर व्यक्त केला आहे. स्वतंत्र भारताच्या इतिहासात आजच्या 26 नोव्हेंबर या दिवसाला एक वेगळं महत्व आहे. हा तोच दिवस आहे ज्या वेळी देश पारतंत्र्यातून बाहेर पडल्यानंतर स्वतंत्र भारतानं संविधान स्वीकारलं. याच दिवशी संविधान सभेनं संविधानाला मंजुरी दिली होती. देशात याच दिवसापासून संविधान लागू झाल्यानं आजचा दिवस संविधान दिवस म्हणून साजरा केला जातो.

Open chat
Join our WhatsApp group