Ryan Burl: 6,6,6,6,4,6… रायन बुर्लने एकाच षटकात ठोकल्या 34 धावा!


बांगलादेश आणि झिम्बाब्वे यांच्यात सुरू असलेल्या तिसऱ्या T20 सामन्यात प्रेक्षकांना क्वचितच अपेक्षित असलेले दृश्य पाहायला मिळाले. या T20 सामन्यात झिम्बाब्वेचा फलंदाज रायन बुर्ल याने बांगलादेशचा गोलंदाज नसूम अहमदच्या एका षटकात पाच षटकार आणि एक चौकार लगावत 34 धावा फटकावल्या. यासोबतच टी-20 सामन्यातील एकाच षटकात सर्वाधिक धावा करण्याचा त्याने संयुक्त विक्रम बनला आहे.

झिम्बाब्वेचा फलंदाज रायन बुर्ल याने बांगलादेश विरुद्ध वादळी खेळी करत भारताचा माजी फलंडाज युवराज सिंगची आठवण करून दिली. 28 वर्षीय बुर्लने बांगलादेशच्या नसूम अहमदच्या एका षटकात 34 धावा फटकावल्या. T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात तिसऱ्यांदा एका षटकात सर्व चेंडूंवर सीमापार गेले. याआधी युवराज सिंगने इंग्लंडच्या ब्रॉडला आणि विंडीजच्या पोलार्डने यांनी श्रीलंकन गोलंदाज धनंजयच्या एकाच षटकात सर्व चेंडू सीमापार घालवत 36 धावा वसूल केल्या होत्या.

Join our WhatsApp group