‘या’ गंभीर आजारांपासून बचाव करते लिंबू पाणी, वेट लॉसमध्येही फायदेशीर!

जेवणाची चव वाढवणारा लिंबू (Lemon water)प्रत्येक स्वयंपाकघरात सहज उपलब्ध होतो. अनेक दशकांपासून लिंबू अनेक प्रकारे वापरला जात आहे. कॉफी आणि चहा पिण्यापेक्षा सकाळी लिंबू पाणी पिणे फायदेशीर असते. यामुळे त्वचा (Skin care) आणि डायजेशन (Digestion) चांगले राहते. लिंबूपाणी प्यायल्याने मूड दिवसभर फ्रेश राहतो. लिंबूपाणी हे एक प्रकारचे देसी ड्रिंक आहे, ज्याचा आरोग्यावर कोणताही वाईट परिणाम (Health benefits) होत नाही. प्रथिने, जीवनसत्त्वे, कार्बोहायड्रेट्स आणि मिनरल्सने (minerals) भरपूर असलेल्या लिंबूचे अगणित फायदे आहेत. जे तुम्हाला माहिती नसतील. चला जाणून घेऊया लिंबू पाणी पिण्याचे 5 महत्त्वाचे फायदे.

रोगप्रतिकारशक्ती वाढवते

स्टाइलक्रेसच्या मते, लिंबूपाण्यात व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते, जे एक उत्तम अँटी-ऑक्सिडेंट आहे. एक कप लिंबूपाण्यात 94 मिलीग्राम व्हिटॅमिन सी असते. जे दैनंदिन गरज पूर्ण करते. व्हिटॅमिन सी हा आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी एक चांगला स्रोत आहे. यामुळे सेल्युलर फंक्शन आणि B&T पेशींची ग्रोथ वाढते. याचे सेवन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते.

लिंबू पाणी वजन कमी करते

आजकाल लठ्ठपणामुळे प्रत्येकजण त्रस्त आहे. आपले वजन नियंत्रणाबाहेर जाऊ नये अशी प्रत्येकाला काळजी असते. लठ्ठपणा कमी करू इच्छिणाऱ्यांपैकी तुम्हीही एक असाल, तर तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवात कोमट लिंबू पाण्याने करावी. तुम्ही ते दिवसातून किमान दोनदा प्या. त्यामुळे भूक कमी लागते आणि पचनक्रिया सुरळीत राहते.

लिंबूपाणी डायबिटीजपासून बचाव

जर तुम्हाला हाय ब्लड शुगरची समस्या असेल तर लिंबू पाणी तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. लिंबू पाणी प्यायल्याने मधुमेहाची समस्या दूर राहते.

त्वचेसाठी खूप फायदेशीर

कोमट लिंबू पाणी प्यायल्याने त्वचेशी संबंधित सर्व प्रकारच्या समस्यांपासून सुटका मिळते. त्वचेवर डाग पडणे, पुरळ येणे यासारख्या समस्या असतील तर त्यापासूनही सुटका मिळते.

लिंबूपाणी ब्लड प्रेशर कंट्रोल करते

अनेकांना हाय ब्लड प्रेशरची समस्या असते. ज्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी ते खूप काही करतात. लिंबू पाणी प्यायल्याने या समस्येपासून सुटका मिळते. लिंबूमध्ये पोटॅशियम आणि कॅल्शियमचे प्रमाण चांगले असते, जे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते. लिंबू पाणी पिण्याचे हे महत्त्वाचे फायदे आहेत, ज्यापासून आरोग्याला खूप फायदा होतो. जर तुम्हालाही यापैकी कोणत्याही समस्येचा सामना करावा लागत असेल तर आजपासूनच लिंबूपाणी पिण्यास सुरुवात करा.

Join our WhatsApp group