सांगली : पूर्ववैमनस्यातून तरुणावर खुनी हल्ला ; तिघांना अटक

शहरातील बहे नाका परिसरातील बेघर वसाहतीमधील एकावर चौघांच्या टोळक्याने पूर्ण वैमनस्यातून तलवार, कोयता आणि लोखंडी गजाने हल्ला चढवत त्याच्या खुनाचा प्रयत्न केल्याची घटना घडली. हा प्रकार गुरुवारी सायंकाळी सातच्या सुमारास घडला. यातील तिघा संशयतांना पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत जखमी नवनाथ भीमराव कांबळे (वय २५) राहणार बहे नाका बेघर वसाहत यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार जयंत उर्फ आबा रघुनाथ शिंदे, उद्धव रघुनाथ शिंदे, रोहित जाधव स्वप्निल उर्फ डी.जे अशा चौघांविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यातील स्वप्निल उर्फ डीजे हा फरार झाला असून इतर तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. येथील न्यायालयाने त्यांना सोमवार पर्यंत पोलीस कोठडी ठेवण्याचे आदेश दिला आहे.

Join our WhatsApp group