गांजा विक्री करणाऱ्या दोघांना अटक : ३५ हजार रुपये किमतीच्या गांजा सहित इतर मुद्देमाल जप्त :मिरजेत ऐन दिवाळीच्या सणामध्ये नशेखोर व हुलडबाज, गांजा- गरदुल्यांनी मिरज बस स्थानक, व मिरज रेल्वे जंक्शन परिसरात प्रवाशांची लूटमार करू नये, कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता महात्मा गांधी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांनी तातडीने गांजाची नशा करणारे व गांजाची विक्री करणारे यांच्या वरती माहिती मिळाल्यास कडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महात्मा गांधी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये मिरज शहरातील मध्यवर्ती बस स्थानकाच्या भिंतीकडेला गांजा विक्री करिता आरोपी नवाज सलाम मकानदार (वय 37 वर्ष रा. रॉकेल डेपो झोपडपट्टी मिरज) व अखिलेश मल्लेशआप्पा ऐरमसाळ (वय 21 वर्षे राहणार सिद्धारूढ मठ ,अयोध्या नगर हुबळी ,ता. हुबळी ,जि.धारवाड, राज्य कर्नाटक) हे दोघे बसले असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.सहाय्यक पोलीस निरीक्षक फडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली, पीएसआय प्रमोद खाडे यांच्या नेतृत्वात तातडीने गांजा विक्री करणाऱ्यांच्या मुसक्या आवळत महात्मा गांधी पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी बेधडक कारवाई केली.

न्याय हक्काबाबत समज देऊन सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार त्यांना अटक करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले.यामध्ये ३५४८० रुपये किमतीचा ३ किलो ५४८ ग्रॅम वजनाचा गांजा, दोघांचे मोबाईल आणि ४३० रुपये रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.सदरची कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांच्या आदेशानुसार पोलीस उपनिरीक्षक प्रमोद खाडे, सहाय्यक पोलीस फौजदार उदय कुलकर्णी ,पोलीस हेड कॉन्स्टेबल चंद्रकांत गायकवाड, पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन कुंभार पोलीस, कॉन्स्टेबल संतोष माळी, पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण हुकिरे, पोलीस कॉन्स्टेबल बसवराज कुंदगोळ, पोलीस कॉन्स्टेबल अमोल आवळे व चालक पोलीस कॉन्स्टेबल विकास कांबळे आणि चालक सहाय्यक पोलीस फौजदार सतीशकुमार पाटील यांनी केली आहे.

Join our WhatsApp group