गहाणवट ठेवलेले दागिने परत देण्याकरत फसवणूक केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात सराफावर गुना दाखल झाला आहे. हाजी पांडुरंग खोत (रा. डेक्कन मिलसमोर) असे त्याचे नांव आहे. या प्रकरणी नसिमा जावेद ऐनापुरे (वय ३२.चां कियाद दिली याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, संशयित शहाजी खोत साचे देकन मिलसमोर अमोल ज्वेलर्स नावाचे दुकान आहे.
त्याने फेब्रुवारी २०२३ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत फिर्यादी नसिमा जावेद ऐनापुरे यांचा विश्वास संपादन करून त्यांच्याकडून ७३ ग्रॅम वजनाचे सोने गहाणवट देवून घेऊन दरमहा ३.५ टक्के व्याजाने २ लाख २१ हजार ४८४ रुपये दिले होते. ऐनापुरे यांनीही दरमहा त्याप्रमाणे व्याजाची रक्कम वेळोवे दिली. व्याज देण्यास विलंबासोबत ऐनापुरे यांनी संपूर्ण रक्कम देतो आमचे दागिने परत दे असे वारंवार सांगत होत्या. परंतु दागिने देण्यास खोत हा टाळाटाळ करत उडवाउडवीची उत्तरे देत होता, त्यामुळे फसवणूक केल्याप्रकरणी ही खोत याच्या विरोधात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
