Homeसांगलीसांगलीत एसटी चालकाला अचानक चक्कर आल्याने बस थेट चहाच्या टपरीवर धडकली; मोठा...

सांगलीत एसटी चालकाला अचानक चक्कर आल्याने बस थेट चहाच्या टपरीवर धडकली; मोठा अनर्थ टळला, सर्व प्रवासी सुखरूप

सांगली-ईश्वरपूर रस्त्यावरील तुंग येथे एसटी बसचा विचित्र अपघात घडला. शिराळा आगाराच्या एसटी बस चालकाला गाडी चालवताना अचानक चक्कर आल्याने त्याचे बसवरील नियंत्रण सुटले. नियंत्रण सुटलेली बस आधी दुभाजकावर चढली आणि त्यानंतर थेट रस्त्यालगत असलेल्या एका चहाच्या टपरीवर जाऊन जोरदार धडकली. सुदैवाने या भीषण अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून, बसमधील सर्व प्रवासी सुखरूप बचावल्याने मोठा अनर्थ टळला आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, शिराळा आगाराची ही एसटी बस प्रवासी घेऊन ईश्वरपूर मार्गावरून जात असताना तुंग परिसराजवळ चालकाला अचानक अस्वस्थ वाटू लागले आणि चक्कर आली. क्षणात चालकाचे स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटल्याने बस रस्त्यावरील दुभाजक ओलांडून रस्त्याच्या कडेला असलेल्या चहाच्या टपरीमध्ये घुसली. या धडकेत एसटी बसच्या दर्शनी भागाचे तसेच चहाच्या टपरीचे मोठे नुकसान झाले आहे.

 

स्थानिकांची तातडीने मदत

 

अपघाताचा मोठा आवाज ऐकताच परिसरातील नागरिकांनी आणि प्रत्यक्षदर्शींनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांनी तातडीने प्रवाशांना बसबाहेर काढण्यास मदत केली. सुदैवाने टपरीमध्ये आणि रस्त्यावर त्यावेळी लोकांची वर्दळ कमी असल्याने मोठी दुर्घटना टळली. चक्कर आलेल्या चालकाला प्राथमिक उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -