इचलकरंजी-कोल्हापूर रोडवरील व्यंकटेश्वरा हायस्कुलजवळ भरधाव टेम्पोने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील दोघेजण जखमी झाले. याप्रकरणी अज्ञात टेम्पो चालकाच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, मजुरी काम
करणाऱ्या पुजा सुनिल शेलार (वय ४८ रा. कबनूर) आणि श्रीकांत शंकर जगदाळे (वय ६५ रा. जवाहरनगर) हे दोघे बुधवारी रात्री साडेअकरा वाजता दुचाकीवरुन काम संपवून घरी निघाले होते. कबनुरनजीकच्या व्यंकटेश्वरा हायस्कूलजवळ आले असता एका भरधाव टेम्पोने त्यांना जोराची धडक दिली. या अपघातात श्रीकांत यांच्या डोक्यास, चेह-यास आणि दोन्ही हातास गंभीर दुखापत झाली आहे. तर पुजा यांच्या उजव्या खांद्यास, पायास, डाव्या हातास मुकामार लागला आहे. अपघातानंतर टेम्पोचालकाने न थांबता घटनास्थळावरुन पलायन केले आहे. याप्रकरणी पुजा शेलार यांच्या फिर्यादीनुसार शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अज्ञात टेम्पोचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

