Friday, June 21, 2024
Homeकोल्हापूररंकाळा, कळंबा तलावांवर नागरिकांना बंदी; निर्बंध लागू

रंकाळा, कळंबा तलावांवर नागरिकांना बंदी; निर्बंध लागू

जिल्ह्यात रविवारी रात्री 12 वाजल्यापासून रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. रात्री 11 ते पहाटे 5 या वेळेत अत्यावश्यक कारणाखेरीज बाहेर फिरण्यासाठी ही बंदी असेल. त्याचबरोबर अनेक निर्बंधांचीही कडक अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यानुसार रंकाळा, कळंबा तलाव, पर्यटन व ऐतिहासिक ठिकाणांसह धरणस्थळांवर नागरिकांना जाण्यास बंदी घालण्यात आली आहे.

याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी रविवारी रात्री प्रसिद्ध केले. त्याचे उल्‍लंघन करणार्‍यांवर फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, पोलिस प्रशासनाच्या वतीने रात्री शहराच्या प्रमुख मार्गांवरून संचलन करण्यात आले.रात्री 11 ते पहाटे 5 या वेळेत जिल्ह्यात संचारबंदी लागू केली आहे. यामुळे अत्यावश्यक कारणाशिवाय कोणालाही या कालावधीत बाहेर फिरता येणार नाही. रात्रीच्या संचारबंदीच्या अंमलबजावणीसाठी ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात केला जाणार आहे.

कोल्हापूर शहरातील रंकाळा, कळंबा तलावांवर नागरिकांना बंदी घालण्यात आली आहे. यासह जिल्ह्यातील राधानगरी, काळम्मावाडी, तिलारी, पाटगाव, मानोली, कोदे, चित्री, जंगमहट्टी या धरणस्थळांवर तसेच कागल येेथील जयसिंगराव तलावही नागरिकांसाठी बंद राहणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -