Friday, November 22, 2024
Homeतंत्रज्ञानकशी कराल डिजिटल रुपयाची देवाण-घेवाण ? मोबाईलमधूनच चालणार बँक

कशी कराल डिजिटल रुपयाची देवाण-घेवाण ? मोबाईलमधूनच चालणार बँक

चलन आले तसे वस्तूविनियम पद्धत बाजूला हटली. कागदी नोटा आल्या आणि कथील, रोकडा आणि अन्य चलन काळाच्या पडद्याआड गेली. आता डिजिटल युगात कागदी नोटांना हद्दपार करण्याचे प्रयत्न सुरु झाले आहेत. क्रेडीट, डेबीट क्रार्ड नंतर डिजिटल पेमेंटमुळे नगद व्यवहार अवघ्या काही सेंकदावर आणि एक-दोन क्लिकवर होत आहे. चलनाचा इतिहास खूप जुना असला तरी त्यातील होत गेलेले बदल काळाच्या कसोटीवर खरे उतरले आहेत. आता आणखी एक पाऊल पुढे टाकत भारतीय रिझर्व्ह बँक देशाची स्वतःची डिजिटल करन्सी आणत आहे. डिजिटल रुपयांत येत्या काही काळात लोकांना व्यवहार करणे सोपं होईल. या करन्सीचे नाव सेंट्रल बँक ऑफ डिजिटल करन्सी असे आहे. दोन टप्प्यात ही करंन्सी आणण्याचा प्रयत्न बँक करत आहे. CBDC बेस्ड होलसेल अकाऊंट साठी पायलट टेस्टिंग लवकरच सुरु होईल. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सेंट्रल बँक डिजिटल करेन्सीच्या लोकार्पणासाठी स्वतःला पुर्णपणे तयार ठेवले आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2022 चा अर्थसंकल्प सादर करताना सांगितले की, भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) पुढील आर्थिक वर्षात डिजिटल रुपया बाजारात आणणार आहे. अर्थमंत्री म्हणाल्या की, डिजिटल रुपया हे केंद्रीय बँक डिजिटल चलन असेल, जे 2022-23 मध्ये सुरू केले जाईल. केंद्रीय बँक डिजिटल करन्सीमुळे डिजिटल अर्थव्यवस्थेला लक्षणीय चालना मिळेल, असे अर्थमंत्री म्हणाल्या. सीतारामन म्हणाल्या, “डिजिटल चलनामुळे चलन व्यवस्थापन प्रणाली आणि कार्यक्षम आणि परवडणारी होईल.” सीबीडीसी म्हणजे काय आणि त्याचे महत्त्वाचे फायदे काय आहेत हे जाणून घेऊयात.

सेंट्रल बँक डिजिटल करन्सी (CBDC) हे आरबीआयने जारी केलेले डिजिटल चलन आहे. ही कायदेशीर निविदा असेल. आरबीआयच्या म्हणण्यानुसार, हे मध्यवर्ती बँकेने जारी केलेले चलन असेल परंतु ते कागद किंवा पॉलिमरपेक्षा वेगळे असेल. बँकेच्या ताळेबंदात ही ते दर्शविण्यात येणार आहे. रोखीने व्यवहार करताना सीबीडीसीची किंमत समान असेल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -