Sunday, December 22, 2024
Homeब्रेकिंगमहाबळेश्वर रस्त्यावर रानगव्यांचा मुक्त संचार

महाबळेश्वर रस्त्यावर रानगव्यांचा मुक्त संचार

पर्यटकांचे विशेष आकर्षण असलेल्या सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथे सध्या रानगव्यांचा वावर वाढला आहे. सातारा-पाचगणी महाबळेश्वर रस्त्यावर वेण्णा लेक जवळ आज सकाळी रानगव्यांचा मुक्त संचार पहायला मिळाला.

महाबळेश्वर तालुक्यात मोठ्या प्रमाणात जगाला क्षेत्र आहे. या याठिकाणी जगलं असल्याने मोठ्या संख्येने विविध प्राणी वास्तव्यास असतात. दरम्यान जंगल भागाने वेढलेल्या या भागात अनेक वेळा रानगव्यचे दर्शन होत असते.

या ठिकाणी मोठ्या संख्येने पर्यटक फिरण्यासाठी येतात. सध्या या ठिकाणी मोठ्या संख्येने रान गव्यांचे गाळप आढळून येत आहेत. सोमवारी काही पर्यटकांना रांगव्याच्या कळपाचे दर्शन झाले. त्या रांगव्याच्या कळपाचे फोटो आणि व्हिडीओ त्या पर्यटकांनी आपल्या मोबाईलमधील कॅमेयात कॅमेराबद्ध केले. सोमवारी सकाळी सातारा-पाचगणी महाबळेश्वर रस्ता ओलांडताना हे अनेक गवे दिसून आले. सकाळी रहदारी नसल्याने हे गवे देखील निवांत रस्ता ओलांडत होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -