खतरों के खिलाडी हा रिअॅलिटी शोच्या बाराव्या सीझनची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या शोमध्ये कोणते स्पर्धिक असतील हे जाणून घेणे प्रत्येकालाच आवडेल. चला तर मग जाणून घेऊया या शोचा कोण कोण भाग असेल.
रोहित शेट्टीचा स्टंटवर आधारित शो खतरों के खिलाडी 12 सध्या खूप चर्चेत आहे. माध्यमांमधील रिपोर्टनुसार या शोच्या स्पर्धकांची नावे समोर आली आहेत. मात्र याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. या हंगामात टीव्ही सीरियल्समधील काही स्टार्ससह ‘बिग बॉस 15’मधील काही खास नावांची देखील चर्चा आहे. जाणून घेऊया यावेळी कोणते स्टार्स या शोचा भाग असणार आहेत.
ये रिश्ता क्या कहलाता है आणि बालिका वधू 2 या मालिकेत झळकलेली अभिनेत्री शिवांगी जोशी सध्या तिच्या कामामुळे प्रचंड चर्चेत आहे. आता तिच्या हाती ‘खतरों के खिलाडी 12’ हा शो देखील लागला असल्याचे बोलले जात आहे. ती या शोची सर्वात महागडी स्पर्धक म्हणून प्रवेश करेल असे मानले जात आहे.
मीडिया रिपोर्ट्नुसार खतरों के खिलाडी 12 च्या निर्मात्यांनी एरिका फर्नांडिसच्या नावाला देखील मान्यता दिली आहे. लवकरच एरिका फर्नांडिसही रोहित शेट्टीच्या शोमध्ये खतरनाक स्टंट करताना दिसणार आहे. नुकतीच ती कुछ रंग प्यार के या शोत दिसली होती.
बिग बॉस 15 मध्ये Rajiv Adatia हा स्पर्धेक चर्चेत होता. मात्र तो या शोमध्ये जास्त काळ टिकू शकला नाही. आता राजीवला खतरों के खिलाडी सीझन 12 साठी अप्रोच करण्यात आल्याचे बोलले जात आहे.
प्रतीक सहजपालने बिग बॉस 15 मधून प्रेक्षकांची मने जिकंली होती. आता तो रोहित शेट्टीचा लोकप्रिय शो खतरों के खिलाडी सीझन 12 मध्ये दिसणार असल्याच्या बातम्या आहेत.
पारस छाबराला दोन ते तीन वेळा खतरों के खिलाडीची ऑफर मिळाली होती. परंतु काही कारणास्तव तो या शोचा भाग होऊ शकला नाही. मात्र या सीझनमध्ये तो देखील दिसणार असल्याचे वृत्त आहे.
निशांत भट्ट खतरों के खिलाडी 12 च्या निर्मात्यांशीही चर्चा करत आहे. त्यामुळे प्रतीक सहजपाल आणि निशांत यांना एकत्र पाहिल्यावर चाहत्यांना आनंद होईल. निशांतनेही बिग बॉसमध्ये चांगला खेळ दाखवला होता.
या यादीत पुढचे नाव उर्वशी ढोलकियाचे आहे. उर्वशी ढोलकिया सध्या नागिन 6 मध्ये काम करत आहे. त्यामुळे ती ‘खतरों के खिलाडी’चे शूटिंग कसे करणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
डान्स दिवाने शोचा जज तुषार कालिया रोहित शेट्टीच्या खतरों के खिलाडी 12 मध्ये दिसणार आहे. तो त्याच्या फिटनेससाठी ओळखला जातो. या शोमध्ये डान्सर पाहणे खूप मनोरंजक असेल.
बिग बॉस 13 मध्ये दिसलेली टीव्ही अभिनेत्री आरती सिंह देखील खतरों के खिलाडी 12 चा भाग असणार आहे. आरती सिंह बऱ्याच दिवसांपासून टीव्हीपासून दूर आहे. नुकतीच ती अंकिताच्या होळी पार्टीत दिसली होती.