कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत खरी लढत काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव आणि सत्यजित कदम यांच्यात सुरू आहे. मात्र, असं असलं तरी अपक्ष उमेदवार करुणा शर्मा यांनीही खातं खोलून राजकीय वर्तुळाचं लक्षा आपल्याकडे वेधून घेतलं आहे.
कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत खरी लढत काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव आणि सत्यजित कदम यांच्यात सुरू आहे. मतमोजणी सुरू झाल्यापासून जयश्री जाधव यांनी मोठी आघाडी घेतली आहे. जवळपास 9 हजार मतांची त्यांनी आघाडी घेतली आहे. त्यामुळे जाधव यांच्या विजयाचे संकेत मिळत आहेत. तर कदम हे पिछाडीवर पडले आहेत. मात्र, असं असलं तरी अपक्ष उमेदवार करुणा शर्मा यांनीही खातं खोलून राजकीय वर्तुळाचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं आहे.
करुणा शर्मा यांना पाचव्या फेरीअखेर 28 मते मिळाली आहेत. करुणा शर्मा या स्वत: मतमोजणीच्या ठिकाणी उपस्थित आहेत. येणारी प्रत्येक निवडणूक लढणार असल्याचं करूणा शर्मा यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे या निवडणुकीत त्यांना एकूण किती मते मिळतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.