ताजी बातमी ऑनलाईन टीम
संजय पवार हेच शिवसेनेचे अधिकृत उमेदवार आहेत. राज्यसभेच्या एका जागेसाठी उद्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेनेचे अधिकृत उमेदवार संजय पवार हे उमेदवारी अर्ज भरणार आहेत, अशी माहिती शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज माध्यमांशी बोलताना दिली.
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली असून, निम्याहून अधिक मतांची संख्या आमच्याकडे असल्याचे खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले.