लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांनी वसवलेले जयंसिगपूर हे सर्वात सुंदर शहर आहे. या शहराशी स्व. शामराव पाटील यड्रावकर यांच्यानंतर आमच्या तिसऱ्या पिढीचे नाते कायम आहे. त्यामुळे या शहरामधील जनतेच्या व्यापाऱ्यांच्या उद्योजकाच्या समस्या आणि अडचणी आम्हाला माहिती आहेत.
त्या सोडवण्यासाठी मागील वीस पंचवीस वर्षात आम्ही सर्वांना सोबत घेऊन जवळपास दोनशे कोटी रुपयांचा निधी शहराच्या विकासासाठी खेचून आणला आहे. यापुढेही शहर मॉडेल सिटी बनवण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत, असे उद्गार माजी नगराध्यक्ष आणि राजर्षी शाहू विकास आघाडीचे अध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांनी काढले. यावेळी संभाजी मोरे, शंकर बजाज, वासुदेव भोजने, प्रवीण पाटील, गणेश गायकवाड, सुधीर खाडे, अमोल कांबळे उपस्थित होते.