Sunday, July 27, 2025
Homeब्रेकिंगआज ‘या’ जिल्ह्यांत धो-धो बरसणार पाऊस..

आज ‘या’ जिल्ह्यांत धो-धो बरसणार पाऊस..

आज हवामान विभागाकडून मोठी अपडेट जारी केली गेली आहे. अंदमान समुद्र आणि बंगालच्या उपसागरात नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी काही दिवस घालवल्यानंतर यंदा तीन दिवस आधीच केरळमध्ये मान्सूनचं आगमन झालं आहे. यानंतर दक्षिणेकडील बऱ्याच राज्यांमध्ये पाऊस होण्याचा इशारा हवामान खात्याने दिला होता. मागील काही दिवसांपासून दक्षिणेकडील राज्यांमध्ये काही क्षेत्रांत मुसळधार पाऊस झाला आहे. यानंतर आता महाराष्ट्रात देखील मान्सूनच्या आगमनासाठी पोषक असं हवामान आता तयार झालं आहे. म्हणून आगामी आठवडाभरात महाराष्ट्रात मान्सून दाखल होऊ शकतो, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

आता काल झालेल्या मान्सून पूर्व पावसाने महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात हजेरी लावलीय. मागील 24 तासांत राज्यातील विदर्भ, सातारा व बीड जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी विजांच्या गडगडाटासह पावसाने हजेरी लावली आहे. रस्त्यांवर पाणी पाणी झाल्याचं चित्र देखील आपल्याला सोशल मीडियावरील व्हिडिओमध्ये दिसलं असेलच. याशिवाय राज्यातील काही जिल्ह्यामध्ये मोजक्या ठिकाणी मान्सून पूर्व पावसाच्या सरी कमी प्रमाणात का होईन पण कोसळल्या आहेत.

सध्या राज्यात काही ठिकाणी पावसाचे वातावरण तयार झाले असले तरी प्रत्यक्षात काही ठिकाणीच सारी कोसळताना दिसल्या. तसेच आता दक्षिण-पूर्व अरबी समुद्रामध्ये काळे ढग जमा झाल्याचं समजत आहे. त्यावरून येत्या काही तासांतच आज दिवसभरात केरळ व कर्नाटकाच्या दिशेनं या ढगांनी मार्गक्रमण केल्यास किनारपट्टीच्या लगतच्या भागात व दक्षिणेकडील राज्यांत काही प्रमाणात हलका पाऊस पडू शकतो, अशी भारतीय हवामानशास्त्र विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ के एस होसाळीकर यांनी माहिती दिली आहे.

दरवर्षी 1 जूनच्या दरम्यान केरळमध्ये नैऋत्य मोसमी वाऱ्यांचं म्हणजेच शेतकरी राजा आतुरतेने वाट पाहत असलेल्या मान्सूनचं आगमन होतं. पण यंदा तीन दिवस आधीच मान्सूनचा केरळात एंट्री करून आता महाराष्ट्रात येण्यासाठी सज्ज झाला आहे. दक्षिण केरळातील अनेक भागात जोरदार पाऊस आता चालू झाला आहे. सध्या मान्सूनच्या पुढील मार्गक्रमणासाठी पोषक हवामान तयार झालं आहे. पुढील आठवड्यात महाराष्ट्रात देखील मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. दरम्यान बीड आणि सातारा परिसरात काही ठिकाणी काहीसा पाऊस झाला आहे.

दरम्यान आता महाराष्ट्रात शेतीच्या दृष्टीने बरेच जिल्हे या पावसावर अवलंबून असतात. पाण्याचा अभाव असल्याने बऱ्याच ठिकाणी पावसावर पेरणी होते तर काही जिल्ह्यांत अजूनही वर्षभरात फक्त पावसाळ्यानंतर काही पिके घेतली जातात. म्हणून पाऊस हा शेतकऱ्यांचे आर्थिक हाल न व्हावे यासाठी विदर्भातील काही जिल्ह्यांत व इतर भागांत महत्वाचा समजला जातो. आता पुढील दोन दिवस विदर्भ आणि दक्षिण महाराष्ट्रात येणाऱ्या अनेक जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. या दरम्यान जास्त विजांचा कडकडाट आणि पाऊस होणार आहे. याशिवाय हवामान खात्याने आज सांगली, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, नांदेड, परभणी, हिंगोली, उस्मानाबाद, लातूर या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केलाय. येत्या काही तासांमध्ये याठिकाणी पावसाच्या सरी कोसळू शकतात, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. तर विदर्भातील अमरावती, वर्धा नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा आणि गडचिरोली परिसरात तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळणार आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -