ताजी बातमी ऑनलाईन टीम
कोल्हापूर : वीज पुरवठा खंडीत झाल्याने व्हेंटिलेटरवरील रुग्णाचा मृत्यू झालाय. कोल्हापुरातील (Kolhapur News) उचगांवमध्ये ही धक्कादायक घटना घडली. आमेर ८ काळे अस मृत रुग्णांचं नाव आहे. महावितरणच्या (Mahavitaran) अधिकारी कर्मचाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी संतप्त नातेवाईकांनी भरपावसात रुग्णालयाच्या आवारात ठिय्या आंदोलन केलंय.
दरम्यान, वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर मृतदेह ताब्यात घेतलाय. फुफ्फुसाच्या आजाराने त्रस्त असलेल्या आमेशवर गेल्या वर्षभरापासून सुरू होते. घरीच व्हेंटिलेटरवर त्याच्यावर उपचार सुरु होते. वीजबिल थकीत असल्याने 30 मे रोजी आमिशच्या घरचा वीजपुरवठा महावितरणने खंडीत केला होता. गेल्या दोन दिवसापासून शेजाऱ्यांकडे वीज घेऊन व्हेंटिलेटर सुरु होतं. मात्र बुधवारी सायंकाळी सर्वच वीज पुरवठा खंडीत झाल्याने व्हेंटिलेटर बंद झाल्यानं आमिशचा मृत्यू झाला.