बॉलिवूडचा दबंग सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांना ठार मारण्याची धमकी आल्यामुळे खळबळ उडाली आहे. त्यातच मोठी माहिती समोर आली आहे. सलमान खानला ठार मारण्याचा कट होता. त्यासाठी 4 लाख रुपयांची रायफल देखील खरेदी करण्यात आली होती. अशी माहिती तपास यंत्रणेला मिळाली. गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याने सलमानच्या हत्येचा कट रचल्याची कबुली दिली होती. तुरुंगात असलेल्या लॉरेन्स बिश्नोई याने सलमान खानला यापूर्वी ठार मारण्याची धमकी दिली होती.
ज्या ठिकाणी मॉर्निंग वॉकला जातात आणि विश्रांती घेण्यासाठी थांबतात त्याचठिकाणी एका बाकावर धमकीचे पत्र सापडले आहे. या पत्रामध्ये त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.
लॉरेन्स म्हणाला, सलमान खानची सुपार त्याने राजस्थानचा गँगस्टर संपत नेहरा (Sampat Nehra) याला दिली होती. त्यानंतर संपत नेहरा मुंबईला आला होता. त्याने सलमान खानच्या घराची रेकी देखील केली होती. संपतने सलमान खानला मारण्यासाठी रायफल देखील खरेदी केली होती. त्यासाठी त्याने 4 लाख रुपये मोजले होते. परंतु, संपतला सलमान खानपर्यंत पोहोचता आले नाही. त्याचा कट अयशस्वी ठरला होता.
सलमान खानला ठार मारण्याचा होता कट, रायफलही खरेदी केली, लॉरेंसचा मोठा खुलासा
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -