Saturday, August 2, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापूर : सावकारांच्या दहशतीमुळे कंत्राटी कामगाराची आत्महत्या

कोल्हापूर : सावकारांच्या दहशतीमुळे कंत्राटी कामगाराची आत्महत्या

ताजी बातमी ऑनलाईन टीम

खाजगी सावकारांच्या दहशतीला कंटाळून मंगळवार पेठेतील महापालिकेच्या कंत्राटी कामगाराने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याने शहरात खळबळ उडाली आहे. विनायक बाळासाहेब सुर्वे (वय ५०)असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे.
संशयित सावकारांना अटक केल्याशिवाय मृतदेहाचा ताबा न घेण्याचा आक्रमक पवित्रा कुटुंबीयांसह नातेवाईकांनी घेतल्याने सीपीआर रुग्णालय आवारात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे.



सुर्वे यांच्या कुटुंबीयांनी रात्री जुना राजवाडा पोलीस ठाण्यात धाव घेऊन संशयितांविरुद्ध फिर्याद दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. रात्री उशिरापर्यंत ही प्रक्रिया सुरू होती. विनायक सुर्वे महापालिकेच्या उद्यान विभागात कंत्राटी कामगार म्हणून कार्यरत होते. काही काळापूर्वी त्याने व्यक्तिगत कारणासाठी काही सावकारकडून पैसे उचलले होते. मुद्दल आणि व्याजाच्या वसुलीसाठी सावकाराकडून तगादा सुरू होता. शिवाय दहशतही माझंविण्यात येत होती.



या त्रासाला कंटाळून सुर्वे यांनी रविवारी सकाळी राहत्या घरात विषारी औषध प्राशन केले होते. कुटुंबीयांनी बेशुद्ध अवस्थेत त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. मात्र उपचार सुरू असताना सोमवारी सायंकाळी त्यांचा मृत्यू झाला. सुर्वे यांचा मृत्यू झाल्याने नातेवाईकांनी रुग्णालय परिसरात आक्रोश केला. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांचा पहारा ठेवण्यात आला आहे. संशयित सावकारांची नावे रात्री पर्यंत समजू शकली नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -