ताजी बातमी ऑनलाईन टीम
देशातील पहिली अखंड “शिवज्योत”सांगलीत प्रज्वलित झाली आहे. पृथ्वीराज पाटील फाउंडेशनकडून शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने मोठ्या दिमाखात छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी अखंड तेवत राहणारी ज्योत अर्पण केली गेली आहे. यानिमित्ताने रायगडवरून आणण्यात आलेल्या या शिवज्योतीचे मिरवणुकीने स्वागत करण्यात आले.
शिवरायांच्या चरणी शिवज्योत सांगलीतील गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्ट आणि पृथ्वीराज पाटील फाउंडेशन कडून शहरातील शिवाजी मंडई येथे असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचे समोर अखंड तेवत राहणारी ज्योत प्रज्वलित करण्यात आली आहे. शिवराज्यभिषेक दिनाच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी ही ज्योत अर्पण करण्यात आली. ज्योत प्रज्वलित करण्याआधी शहरातून शिवज्योतीची भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली. ज्यामध्ये हजारो शिवभक्त आणि सर्वधर्मीय नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही ‘शिवज्योत’स्थापन करण्यात आली आहे.