ताजी बातमी ऑनलाईन टीम
नवी दिल्ली : पाकिस्तानने दुसऱ्या वनडेत वेस्ट इंडिजवर 120 धावांनी दणदणीत विजय मिळवून तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. या मालिकेतील पहिला सामना यजमानांनी पाच विकेटनं जिंकला होता.
मुलतान येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या सामन्यात इमाम-उल-हक (72) आणि बाबर आझम (Babar Azam) (77) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर पाकिस्ताननं वेस्ट इंडिजसमोर 50 षटकांत 8 गडी गमावून 275 धावा केल्या. या धावसंख्येसमोर पाहुणा संघ 155 धावांत गारद झाला. पाकिस्तानकडून मोहम्मद नवाजने सर्वाधिक चार विकेट घेतल्या आणि त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.