Friday, August 1, 2025
Homeसांगलीसांगली : विट्यात एकाची गळफास घेऊन आत्महत्या

सांगली : विट्यात एकाची गळफास घेऊन आत्महत्या

ताजी बातमी ऑनलाईन टीम

विटा, : विट्यात शिवाजीनगर येथे एका खासगी नोकरी करणाऱ्या व्यक्तीने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. कपिल शिवाजी निकम वय ४८, रा.विटा असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. ही घटना सकाळी ११ वाजण्याच्यापूर्वी घडली असावी, असे चंद्रकांत रामचंद्र निकम यांनी विटा पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. आत्महत्या करण्याचे नेमके कारण समजू शकलेले नाही, असे पोलिसांनी सांगितले.



याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शुक्रवार (दि. १० जून) सकाळी अकराच्यापुर्वी विट्याच्या शिवाजीनगर मध्ये राहणाऱ्या कपिल निकम यांनी राहत्या घराशेजारी असलेल्या गोठ्याच्या पत्र्याच्या शेडमधील लोखंडी अॅगलला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना समजल्यानंतर घरच्या लोकांनी तसेच शेजाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. कपिल हे खासगी नोकरी करीत होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -