ताजी बातमी ऑनलाईन टीम
नायकवडीज ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट आझाद शिक्षण संस्था संचलित जवाहर हायस्कूल ॲड ज्युनिअर कॉलेज मिरज या शाळेचा मार्च २०२२ इयत्ता १० वी चा निकाल हा ९९.१०% लागला आहे.या परिक्षेसाठी एकूण ३३५ विद्यार्थी उर्दू व मराठी माध्यमातून प्रविष्ट झाले होते.या निकालात विशेष प्राविण्यासह ८७ विद्यार्थी,प्रथम श्रेणी मध्ये२१२ विद्यार्थी,व्दितीय श्रेणी मध्ये ३३ विद्यार्थीचा समावेश आहे.
या परिक्षेत कु.मिस्बाह मेहबूब पटवेगार ९५.४० टक्के उर्दू माध्यम,कु.सारा अल्ताफ पटेल ९३.८० टक्के उर्दू माध्यम,कु.मुबिना अनिस पैलवान ९२.२० टक्के मराठी माध्यम यांनी अनुक्रमे प्रथम,द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावला आहे.शाळेच्या या उज्वल यशाबद्दल नायकवडीज ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष इद्रिस नायकवडी,श्रीमती हसीना नायकवडी मुख्याध्यापिका सौ.रिजवाना मुजावर यांनी या विद्यार्थीनींचे अभिनंदन केले आहे.या घवघवीत यशानंतर या विद्यार्थीनींचे मिरजेतून आणि शाळेतून कौतुक होत आहे.