कोल्हापूर शहरातील बाबूजमाल रोडवरील एका जुन्या इमारतीची एका बाजूची भिंत कोसळल्याची घटना घडली. यात एका कारचे मोठे नुकसान झाले आहे. ही घटना आज, सोमवारी सकाळच्या सुमारास घडली. या घटनेनंतर जुन्या इमारतीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
बाबूजमाल परिसरात गायकवाड कुटुंबिय राहतात. त्या जुन्या घराची एक भिंत ढासळून शेजाऱ्यांनी पार्क केलेल्या कारचे मोठं नुकसान झाले. ही भिंत धोकादायक स्थितीत होती आणि ती पाडण्यास संबंधित मालकांनी महापालिकेकडे जानेवारी महिन्याप पाठपुरावा केला होता.
या घटनेत एका सलून शेजारील गवळी कुटुंबियांच्या कारचे नुकसान झाले आहे. दोन दिवसापासून त्याच्या घरात मंगल कार्य सुरु होते. सुदैवाने यात कोणतीही मोठी दुर्घटना झाली नाही.