Monday, February 24, 2025
Homeराजकीय घडामोडीमहाराष्ट्रातील घडामोडींचा प्रवास विधानसभा बरखास्तीच्या दिशेने, अदित्य ठाकरे यांचं मोठं ट्वीट

महाराष्ट्रातील घडामोडींचा प्रवास विधानसभा बरखास्तीच्या दिशेने, अदित्य ठाकरे यांचं मोठं ट्वीट

विधान परिषद निवडणुकीनंतर राज्यातील उद्धव ठाकरे सरकार अडचणीत आले आहे. शिवेसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड पुकारल्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. एकनाथ शिंदे यांचा बंड शमवण्यासाठी शिवसेनेचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) आणि रवींद्र फाटक (Ravindra Phatak) यांनी मुख्यमंत्र्याचा निरोप घेऊन सुरतमध्ये एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. एकनाथ शिंदे आणि मिलिंद नार्वेकर यांच्यात जवळपास एक तास चर्चा झाली. मात्र, एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेसमोर 4 अटी ठेवल्या. शिवसेनेने भाजपसोबत युती करावी, शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबतची आघाडी (Mahavikas Aghadi Sarkar) तोडावी आणि आपण गटनेतेपदी कायम राहणार अशा शिंदे यांच्या अटी आहेत.

दरम्यान एकनाथ शिंदे यांनी आज आपल्यासोबत 40 आमदार असल्याचा दावा केला आहे. तसेच आणखी 10 आमदार आपल्याकडे येणार असल्याचे त्यांनी सांगतिले. शिंदे आणि त्यांच्यासोबतचे सर्व आमदार सोमरावी गुजरातच्या सुरत (Surat, Gujarat) शहरातील दी ग्रँड भगवती हॉटेलमध्ये थांबलेले होते. त्यांना आता गुवाहाटी (Guwahati, Assam) येथे हलवण्यात आले आहे. हे सर्व आमदार भाजपच्या संपर्कात आहेत. शिंदेनी पुकारलेल्या या बंडामुळे माहाविकास आघाडी सरकार संकटात आले आहे. या संदर्भातील सर्व घडामोडींवर या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून आपण नजर ठेवणार आहोत. येथे पुढे जाणून घेऊया या बातमी संदर्भातील सर्व महात्त्वाच्या घडामोडी…

अदित्य ठाकरेंच्या ट्विटरवरून हटवला मंत्री पदाचा उल्लेख
या सर्व राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण आणि राजशिष्टाचार मंत्री अदित्य ठाकरे यांनी आपल्या ट्विटर हॅंडलवरून मंत्री पदाचा उल्लेख काढून टाकला आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -