भारतीय क्रिकेट संघ (Team India) इंग्लंड दौऱ्यावर (London Tour) एकमेव कसोटी सामना (Test Match) खेळणार आहे. परंतु, त्याआधीच मोठी बातमी समोर आली आहे. विराट कोहलीला कोरोनाची बाधा झाली आहे. येत्या 1 जुलैपासून हा कसोटी सामना खेळला जाणार आहे. शेवटच्या निर्णायक कसोटीपूर्वी टीम इंडियाची चिंता वाढली आहे.
विराट कोहलीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने क्रिकेट चाहते नाराज झाले आहे. विराट काही दिवसांपासून मालदीव्हमध्ये सुट्ट्या एन्जॉय करत होता. तो परतल्यानंतर त्याची कोरोना टेस्ट करण्यात आली होती. आता त्या टेस्टचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
विराट कोहलीला मालदीव्हहून परतल्यानंतर त्याला कोरोनाची लागण झाली. परंतु तो सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. विराटला कोरोनाचे कोणतेही लक्षणे नाहीत, त्यामुळे तो कोरोनातून बरा झाला असून कसोटी सामना खेळण्यासाठी सज्ज असल्याचे बोललं जात आहे.
विराट कोहली सध्या इतर क्रिकेटपटूंसोबत इंग्लंडला पोहोचला आहे. परंतु बीसीसीआयने विराट कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे वृत्त उघड होऊ दिले नाही. त्यामुळे मोठी खळबड उडण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही.
मास्कशिवाय रस्त्यांवर फिरताना दिसला विराट
दुसरीकडे, विराट कोहली इंग्लडमधील रस्त्यांवर मास्कशिवाय फिरताना दिसला. विराटचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यामुळे आता विराट कोहलीवर प्रश्नांचा भडीमार सुरु झाला आहे. कोरोनामधून बरं झाल्यानंतरही तो मास्कशिवाय खुलेआम कसा फिरु शकतो, चाहत्यांसोबत सेल्फी कसा घेऊ शकतो, असे अनेक सवाल आता उपस्थित होत आहेत.
दरम्यान, इंग्लंड दौऱ्यावर जाण्यापूर्वी क्रिकेटपटू रवीचंद्रन अश्विनला देखील कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे खबरदारी म्हणून त्याने आपल्या इतर सहकाऱ्यांसोबत इंग्लंडला जाण्यास स्पष्ट नकार दिला होता. त्यामुळेच त्याने सहकारी खेळाडूंसोबत जाण्यास नकार दिला.