ताजी बातमी ऑनलाईन टीम
सोलापूरातील तस्कर टोळीचे सदस्य जेरबंद : एक टेम्पो, अलिशन कारसह 120 मद्याचे बॉक्स जप्त : राज्य उत्पादन शुल्कची उजळाईवाडी नजीक कारवाई
टेम्पोच्या हौद्यामध्ये गाद्या, खुर्त्यांमध्ये लपवून गोवा बनावटीच्या दारुची तस्करी करणारया तीघांना राज्य उत्पादन शुल्क विभागाने जेरबंद केले. त्यांच्याकडून 1 टेम्पो, 1 अलिशान कार, 120 मद्याचे बॉक्स असा समारे 18 लाख 23 हजार रुपयांचा मद्देमाल राज्य उत्पादन शुल्क विभागाने जफ्त केला. वैजनाथ चन्नाबसफ्पा ढंगापुरे (वय 35 रा. वालचंद कॉलेज, सोलापूर), अजय विलास लोंढे (वय 29 रा. लक्ष्मीनगर बाळे, सोलापूर), अर्जुन रमेश कांबळे (वय 27 रा. मुळेगाव, दक्षिण सोलापूर) यांना अटक कर आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, गोवा बनावटीच्या दारुची कोल्हापूर मार्गे सोलापूरपर्यंत छुफ्या पद्धतीने तस्करी करण्यात येणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागास मिळाली होती. यानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने आजरा परिसरात नाका तपासणी सुरु केली होती. यादरम्यान एक मालवाहतूक टेम्पो भरधाव वेगाने पुढे गेल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. तसेच या टेम्पोच्या पुढे काही अंतरावर एक अलिशान मोटार पेट्रोलिंगसाठी असल्याचे दिसून आले. भरारी पथकाने या मोटारीचाही पाठलाग सुरु ठेवला. उजळाईवाडीनजीक राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाने कार व टेम्पोला पकडले. टेम्पोच्या हौद्यामध्ये खुा, गाद्यांच्या खाली दारुचे बॉक्स लपविल्याचे दिसून आले.
कोल्हापूर; गादीमध्ये लपवून दारुची तस्करी
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -