इचलकरंजी शहरातून कर्नाटकातून गुटखा घेऊन जाणार्या पुण्यातील व राजस्थानातील तिघांना स्थानिक गुन्हे शाखा कोल्हापूर यांनी पकडून 16 लाख 50 हजार रुपयांचा गाडीसह मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे या घटनेची नोंद गावभाग पोलिस ठाण्यात झाली आहे
इचलकरंजी शहरासह महाराष्ट्र राज्यामध्ये गुटखा बंदी कायदा लागू केला आहे त्यामुळे महाराष्ट्र राज्यामध्ये गुटखा चोरून विकला जातो इचलकरंजी शहारालगत असणाऱ्या कर्नाटक राज्यातून बोरगाव येथून चोरीछुपे गुटख्याची तस्करी मोठ्या प्रमाणात होत असते याची माहिती पोलिसांना सुद्धा असते पण त्याकडे पोलिस व अन्न प्रशासन याकडे मात्र कानाडोळा करत असतो पण कोल्हापूर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक शैलेश बळकवडे यांच्या सूचनेनुसार कोल्हापूर स्थानिक गुन्हे शाखेतील कर्मचाऱ्यांनी काल बोरगाव मार्गे इचलकरंजी पुण्याला घेऊन जाणारा बुलोरो पिकअप टेम्पो नं MH 12 KP ९८६९ हा पोलिसांनी नदीवेस नाका येथे पकडला आहेत .
या वेळी पोलिसांनी यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली त्यांची झाडाझडती केली असता त्यांच्याकडे विविध प्रकारचा सुगंधी तंबाखू गुटखा 12 लाख 50 हजार रुपये तसेच चार लाख रुपये चा टेम्पो असा ऐकून साडेसोळा लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे हा गुटखा पुण्यावारी राजस्थानला जात होता यामध्ये तुषार खंडोळे राहणार पुणे राजाराम बिश्णोई राहणार पुणे मूळ पत्ता राजस्थान आनंद साळवी राहणार पुणे या तिघांना कोल्हापूर स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली आहे इचलकरंजी शहरातील स्थानिक गुन्हे शाखा बंद करण्यात आली आहे त्यामुळे कोल्हापूर स्थानिक गुन्हे शाखा पथकाची इचलकरंजी शहरांमध्ये धडाकेबाज कारवाई सुरू आहे इतक्या मोठ्या प्रमाणात गुटका शहरातून पुणे मार्गे राजस्थानला जातो त्यामुळे कर्नाटक आंतरराज्य टोळी गुटका तस्करी टोळी असण्याची शक्यता वर्तवली जात आहे कारण राज्यांमध्ये गुटखाबंदी असल्यामुळे कर्नाटक मध्ये गुटका विकण्यास परवानगी आहे पण महाराष्ट्र राज्य मध्ये गुटखा बंदी असल्यामुळे चोरीछुपे गुटका महाराष्ट्रातून राजस्थान व अन्य राज्यांमध्ये जात असतो पण पोलिस याकडे मात्र बारीक आणि लक्ष करून अशा गुटखा तस्करांवर कारवाई करत आहे या कारवाईमध्ये कोल्हापूर स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई केल्यामुळे त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे तर स्थानिक पोलिसांनी कारवाई करत नाही असा सवाल मात्र वरिष्ठांकडून केला जात आहे या घटनेची नोंद गावभाग पोलिस ठाण्यात झाली आहे यामध्ये पोलिसांनी साडेसोळा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर तीन आरोपींना गजाआड केले आहे यावेळी कोल्हापूर स्थानिक शाखेचे पोलीस निरीक्षक संजय गोरले आणि त्यांच्या पथकांनी हि कारवाई केली