ताजी बातमी ऑनलाईन टीम
पुणे ; राज्यात सोमवारपासून मान्सून पुन्हा एकदा सक्रिय होत असल्याचा दिलासादायक अंदाज हवामान विभागाने रविवारी वर्तवला. सोमवारपासून गुरुवारपर्यंत चार दिवस राज्यातील बहुतांश भागांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी जिल्ह्याला तीन दिवस ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे; तर कोल्हापूर, साताऱ्यासह काही जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
ओडिशा भागात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने मान्सूनच्या वाऱ्यांचा वेग पुन्हा वाढला आहे. त्याचा फायदा महाराष्ट्रालाही होणार आहे. हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार 4 ते 7 जुलैदरम्यान कोकणात अतिवृष्टी, तर मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा या भागांत मुसळधार पावसाचा अंदाज आहे. या कालावधीत फक्त उत्तर महाराष्ट्रात कमी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
सावधानतेचा इशारा.