महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील नविन सरकारमध्ये शिरोळचे अपक्ष आमदार(MLA) राजेंद्र पाटील यड्रावकर यांना पुन्हा मंत्री पदाची संधी मिळण्याची अधिक मोठी शक्यता आहे. यड्रावकर यांना शिंदे सरकारमध्ये मंत्री पद मिळावे अशी अपेक्षा शिरोळ तालुक्यातून व्यक्त होत आहे. दरम्यान, मुंबईमधील सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार राजेंद्र यड्रावकर यांना शिंदे सरकारमध्ये मंत्री पद मिळेल याची शाश्वती निर्माण होत आहे.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी शिरोळ विधानसभा मतदार संघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवड ण क लढवली आणि ते मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. या निवडणुकीनंतर राज्यात निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीनुसार यड्रावकर यांनी शिवसेनेला पाठींबा देण्याचा निर्णय घेतला. अर्थात अपक्ष आमदार(MLA) असून देखील शिरोळ तालुक्यातील जनतेशी चर्चा करून यड्रावकर यांनी शिवसेनेला पाठींबा दिला. तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी यड्रावकर यांना शिरोळ तालुक्यातील विकास कामांसंबंधी मदत करण्याची भूमिका घेतली.
नंतरच्या काळात यड्रावकर हे तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी यड्रावकर यांना शिरोळ तालुक्यातील विकास कामांसंबंधी मदत करण्याची भूमिका घेतली. नंतरच्या काळात यड्रावकर हे तत्कालीन ठाकरे सरकारमधील राज्यमंत्री म्हणून कार्यरत राहीले. त्यांच्याकडे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण, वस्त्रोद्योग, वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्य, अन्न औषध प्रशासन या विभागाचे राज्यमंत्री म्हणून यड्रावकर यांनी मागील अडीच वर्षाच्या काळात आपली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. एकनाथ शिंदे यांनी यड्रावकर यांना विकासात्मक कार्याच्या दृष्टीने मदत करण्याची भूमिका घेतली. त्यामुळे यड्रावकर हे एकनाथ शिंदे यांच्या सोबत राहीले. ठाकरे सरकारच्या अडीच वर्षाच्या काळानंतर शिवसेनेत बंडखोरीचा प्रकार घडला. यामध्ये शिंदे यांच्या सोबत राहण्याची भूमिका राजेंद्र यड्रावकर यांनी घेतली.
राज्यातील या राजकीय घडामोडीनंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून नविन सरकार स्थापन झाले आहे. या सरकारमध्ये पुन्हा एकवेळ राजेंद्र पाटील यड्रावकर यांना मंत्रीपद मिळाले पाहिजे, अशी मागणी शिरोळ तालुक्यातील कार्यकर्त्यांतून होत आहे. आता नव्या सरकारमध्ये यड्रावकर यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळेल, अशी अपेक्षाही व्यक्त केली जात आहे. मागील अडीच वर्षाच्या काळात ठाकरे सरकारमध्ये राज्यमंत्री म्हणून यड्रावकर यांनी अत्यंत प्रभावी काम केले आहे. अर्थात याची दखल घेऊन मुख्यमंत्री शिंदे यांनी राजेंद्र यड्रावकर यांना नव्या सरकारमध्ये मंत्रीपद द्यावे, अशी मागणी होत आहे.