प्राथमिक शिक्षक सहकारी बँक निवडणुकीत (Bank election) अखेर तेरा वर्षांनंतर सत्तांत्तर झाले. विरोधी पॅनेलने सत्ताधाऱ्यांचा धुव्वा उठवत बँकेवर सत्ता मिळवली. प्राथमिक शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष राजाराम वरुटे यांच्या सत्तेला विरोधी पॅनेलने सुरुंग लावला. विरोधी शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष जोतिराम पाटील व शिक्षक संघाचे थोरात गट रवि पाटील आदींच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू स्वाभिमानी आघाडीने एकतर्फी विजयी मिळवला.
काल, रविवारी मोठ्या चुरशीने ९७.७३ टक्के मतदान झाले. मतमोजणीच्या प्रारंभीसच विरोधी पॅनेलनी जोरदार मुसंडी मारली होती. करवीर, पन्हाळा, हातकणंगले मतदारसंघातील विरोधी पॅनेलचे तिघे उमेदवार विजयी झाले. त्यामुळे पहिला गुलाल विरोधी पॅनेलने उधळला. हा गुलाल कायम राखत विरोधी पॅनेलने बँकेवर वर्चस्व मिळवले.
शिक्षक बँकेच्या १७ जागांसाठी ५६ उमेदवार रिंगणात होते. प्राथमिक शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष राजाराम वरुटे यांच्या नेतृत्वाखालील सत्तारुढ पॅनेल, शिक्षक संघाचे (थोरात गट) जिल्हाध्यक्ष रवी पाटील, समितीचे जोतिराम पाटील यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू स्वाभिमानी शिक्षक पॅनेल’ व ‘पुरोगामी’चे राज्याध्यक्ष प्रसाद पाटील यांच्या नेतृत्वाखालील ‘पुरोगामी, संघ, समिती परिवर्तन पॅनेल अशी तिरंगी लढत झाली. राजाराम वरुटे यांच्या सत्तेला सुरुंग शिक्षक समितीचे नेते कृष्णात कारंडे व बँकेच्या माजी संचालिका लक्ष्मी पाटील या अपक्ष म्हणून नशीब आजमावत आहेत. आरोप-प्रत्यारोपांमुळे गुरुजींचे राजकारण चांगले तापले होते. शिक्षक बँकेची सत्ता गेली १३ वर्षे राजाराम वरुटे यांच्याकडे आहे. अखेर वरुटे यांच्या सत्तेला सुरुंग लावत विरोधी पॅनेलने बँकेवर वर्चस्व मिळवले. मतदानाचा टक्का वाढला गेल्या पंचवार्षिकपेक्षा मतदानाचा टक्का वाढला आहे. इर्षेने एक एक मतदार बाहेर काढल्याने ही टक्केवारी वाढली आहे. या वाढलेल्या टक्केवारीचा विरोधी पॅनेलला फायदाच झाल्याचे निकालावरुन स्पष्ट इ .