ताजी बातमी ऑनलाईन टीम
कोल्हापूर ; गेल्या काही दिवसांतील सततच्या पावसामुळे तांदूळवाडी (ता. पन्हाळा) येथे डोंगर खचला आहे. त्यामुळे अनेक कुटुंबांनी स्थलांतर केले आहे. गाडीगौंडजवळ कुंभी नदीवर रस्त्याला घालण्यात आलेली संरक्षक भिंतही कोसळल्याने तेथील रस्ता खचला आहे.
तांदूळवाडी हे पन्हाळा तालुक्याच्या पश्चिमेकडील शेवटचे गाव आहे. येथून पुढे गगनबावडा तालुक्याची हद्द सुरू होते. या परिसरात पाऊस आणि वाऱ्याचा मोठा जोर असतो. त्यामुळे विजेचे खांब, झाडे उन्मळून पडतात. तारा तुटतात. परिणामी, गावचा वीजपुरवठा खंडित होतो. वीजपुरवठा खंडित झाला की, पूर ओसरेपर्यंत गाव अंधारात राहते.
सततच्या पावसाने तांदूळवाडी ग्रामस्थांची झोप उडवली आहे. कुंभी नदीवरील मुख्य रस्त्याची संरक्षक भिंत आणि घरांच्या पाठीमागील डोंगर खचल्याने नागरिक भयभीत झाले असून, काही कुटुंबांनी स्थलांतर केले आहे.
कोल्हापूर : पन्हाळा-तांदूळवाडीत डोंगर खचला
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -