Sunday, February 22, 2026
Homeकोल्हापूरमाजी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना धक्का, राष्ट्रवादीच्या नगराध्यक्षांचा भाजपात प्रवेश

माजी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना धक्का, राष्ट्रवादीच्या नगराध्यक्षांचा भाजपात प्रवेश

ताजी बातमी ऑनलाईन टीम

आमदार हसन मुश्रीफांना समरजित घाटगे यांचा मोठा धक्का दिला आहे. कागलच्या एका नगराध्यक्षांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. विद्यमान नगराध्यक्षा माणिक माळी आणि माजी उपनगराध्यक्ष रमेश माळी हे पती पत्नी कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये दाखल झाले आहेत. त्यामुळे समरजित घाटगे यांनी राष्ट्रवादीला पाडलं खिंडार पाडलं आहे. उपनगराध्यक्ष आनंदा पसारे यांचीनी राष्ट्रवादीला सोडचिठी दिली. समरजितराजे घाटगे यांच्या उपस्थितीत प्रवेश करण्यात आला.



राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कागल शहराच्या नगराध्यक्षा सौ. माणिक माळी व त्यांचे पती कागलचे माजी उपनगराध्यक्ष रमेश माळी यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.भाजपचे जिल्हाध्यक्ष व शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी त्यांचे भाजपमध्ये कोल्हापुरातील नागाळा पार्कातील निवासस्थानी स्वागत केले. यानंतर रमेश माळी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. रमेश माळी म्हणाले, मी माझ्या मूळ घरात परत आलो आहे. मला कोणताही संकोच वाटला नाही. मला कधी मुश्रीफ गटात स्वातंत्र्य मिळालं नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -