Tuesday, December 24, 2024
Homeजरा हटकेउर्फी जावेदचा कहर! फक्त अर्ध्या अंगावर घातला ड्रेस, नेटीझन्सनी केले ट्रोल

उर्फी जावेदचा कहर! फक्त अर्ध्या अंगावर घातला ड्रेस, नेटीझन्सनी केले ट्रोल

बिग बॉस फेम अभिनेत्री उर्फी जावेद सध्यासोशल मीडियावर एक मोठी सेन्सेशन बनली आहे. ती नेहमीच तिच्या वेगळ्या लुक आणि फॅशन सेन्समुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. अनेकदा वेगळ्या लूकमधील तिचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होतात. आता पुन्हा एकदा तिचा असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. यात तिने घातलेल्या ड्रेसमुळे ती खूपच चर्चेत आली आहे.

या व्हिडिओत उर्फी जावेद खूपच ग्लॅमरस दिसत आहे. तिने स्किन कलरचा अतिशय शॉर्ट ड्रेस घातला आहे, ज्यात ती खूप बोल्ड दिसत आहे. उर्फी या नवीन ड्रेसमध्ये कॅमेऱ्यात वेगवेगळ्या पोज देत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करताना उर्फीन कॅप्शनमध्ये ‘मला नेहमीच चमकण्याची आशा आहे’ असे लिहिले आहे. अनोखी आणि आउट-ऑफ-द-बॉक्स फॅशन स्टेटमेंट असलेल्या उर्फीने तिचा नवीन डिझाइन केलेला पोशाख फ्लॉंट करतानाचा हा मादक व्हिडिओ शेअर केला आहे.

या व्हिडिओमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. उर्फी जावेदने शरीराला आलिंगन देणारा पोशाख घातलेला दिसत आहे. हा ड्रेस मिड्रिफपासून वेस्टपर्यंत ट्रान्सपरंट आहे. या ड्रेसवरन नेटिझन्सने उर्फीला ट्रोल केले आहे. या ड्रेसमध्ये उर्फी जावेदने तिची कर्व्ह फिगर दाखवली आहे. आणि तिने हा ड्रेस अतिशय आत्मविश्वासाने परिधान केला आहे.

बुधवारी उर्फी जावेदने पापाराझींसाठी पोज दिली आणि तिच्या स्मार्ट फोनवर तिची इंस्टाग्राम पोस्ट दाखवून त्यांना तिचा पोशाख समजावून सांगितला. तिने त्यांना सांगितले की तिने ‘गॅलेक्सी ऑफ स्टार्स’चे चित्र पोस्ट केले आहे. उर्फीने ताऱ्यांच्या आकारात तिच्या केसांच्या क्लिप दाखवल्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -