मिरजेतील सुप्रसिद्ध हृदय रोग तज्ञ डॉ रियाज मुजावर यांनी लहान बालकां पासून ते वृद्धांच्यावर अवघड गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करून जीवदान दिल्याचे अनेक उदाहरणे आहेत पण आता त्यानी अंत्यत कमी कालावधीत एन्जोवोप्लास्टीचा विक्रम करून एका वृद्धाला जीवदान दिले आहे हृदयाची मुख्य नाडी 100 टक्के ब्लॉक असल्याने 35 टक्क्यांवर हृदयाचे पंपिंग आले होते अश्या बिकट परिस्थितीत तात्काळ निर्णय घेऊन डॉ रियाज मुजावर यांनी रुग्णावर एन्जोवोप्लास्टि केली रविवारी अचानक सुभाष नगर येथील गणपतराव पाटील वय 76 यांच्या छाती मध्ये दुखत असल्याने त्यांच्या सुनेने डॉ रियाज मुजावर यांना माहिती दिली डॉ रियाज मुजावर यांनी भरती हॉस्पिटलमध्ये मध्ये उपचारासाठी तात्काळ आणण्यासाठी सांगितले.
डॉ मुजावर यांनी रुग्ण भरती हॉस्पिटलमध्ये येण्या आधी धाव घेतली ,गणपतराव पाटील रुग्णालयात आल्यानंतर तात्काळ उपचार सुरू करून एन्जोवोप्लास्टी करून गणपतराव पाटील यांना जीवदान दिले ,घर ते रुग्णालय यातील नंतर आणि तात्काळ हृदयावर एन्जोवोप्लास्टी उपचार करण्याचा कालावधी याचा विक्रम डॉ रियाज मुजावर यांनी केला आहे आज गणपतराव पाटील यांचे हृदय सामन्य रित्या चालत असल्याने प्रकृती ठणठणीत आहे डॉ रियाज मुजावर यांचे कौतुक सर्वत्र होत आहे.