मिरज रेल्वे स्टेशन समोर हनुमान मंदिर जवळ पहाटेच्या सुमार जीलानी इसमाद्दीन कुडचिकर वय 47 राहणार मिरज कोल्हापूर चाळ ह्याला जबर मारहाण झाल्याची घटना घडली होती. रेकॉर्ड वरील गुन्हेगार असलेला गणेश खन्ना नायडू राहणार रॉकेल डेपो झोपडपट्टी मिरज याने शिवीगाळ करून जीलानी याला खाली पडून पोटावर छातीवर तोंडावर गुप्तांगावर लाथा बुक्याने जबर मारहाण केली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या जीलानी कुडचिकर याला मिरज शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. आज उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला, या प्रकरणी गणेश नायडू याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करून महात्मा गांधी चौकी पोलिसांनी अटक केली आहे.
गणेश नायडू हा रेकॉर्ड वरील अट्टल गुन्हेगार असून त्याचे स्टेशन रोड वर हनुमान मंदिर जवळ पानांची टपरी सुरू केली होती. पानांच्या टपरीचे नुकसान जीलानी कुडचिकर याने केल्याच्या संशयावरून गणेश नायडू याने मारहाण केल्याचे कबुल केले. गणेश नायडू हा रेकॉर्ड वरील अट्टल गुन्हेगार असल्याने दोन दिवसात हद्दपारीची कारवाई होणार होती तोपर्यंत त्याने एकाच खून केला. महात्मा गांधी चौकी पोलिसांनी त्याला जेरबंद केले असून अधिक तपास महात्मा गांधी पोलिस स्टेशन करत आहे.






